अनेकदा पोलिसांना किंवा वाहतूक पोलिसांना मारहाण करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र सध्या सोशल मीडियावर वाहतूक पोलिसाची दादागिरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वाहतूक पोलिसाने चक्क दुचाकीस्वाराला लाथ मारल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कॅनडा कॉर्नर परिसरात ही घटना घडली असून दुचाकीस्वारानेच हा व्हिडीओ काढला आहे.
नाशिकमध्ये वाहतूक पोलिसाचे दादागिरी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरात ही घटना घडली असून दुचाकीस्वारानेच हा व्हिडीओ काढला आहे.
त्याचबरोबर वाहतूक पोलीस नव्या कायद्याच्या नावाखाली लूट करत असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.