Today’s Gold Rate : सोन्याच्या दरात चढ-उतार! काय आहेत आजचे दर? जाणून घ्या एका क्लिकमध्ये

जागतिक बाजारातील अस्थिरता, राजकीय तणाव, रुपयाचे दर आणि कर धोरणे या सर्वांचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर होत असल्याने ग्राहकांवर त्याचा मोठा आर्थिक ताण पडतो.

Today’s Gold Rate : सोन्याच्या दरात चढ-उतार! काय आहेत आजचे दर? जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींमुळे सोन्याच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार दिसून येतात. जागतिक बाजारातील अस्थिरता, राजकीय तणाव, रुपयाचे दर आणि कर धोरणे या सर्वांचा परिणाम थेट सोन्याच्या दरावर होत असल्याने ग्राहकांवर त्याचा मोठा आर्थिक ताण पडतो.

हेही वाचा- 'AI आता 'काय शक्य आहे' या सीमा..'; मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्याविषयी काय म्हणाले?

याचपार्श्वभूमिवर शुक्रवार 12 डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून आली आहे. मागील काही दिवसांत सोन्याचे दर 132,469 रुपयांवर येऊन ठेपले होते. जे आज 1,32,390 वर आले आहेत. जे मागील दिवसाच्या बंद किमतीपेक्षा अंदाजे 75 रुपयांनी कमी होते.

हेही वाचा- Cough Syrup Scam : कफ सिरप घोटाळा! ईडीची 25 ठिकाणी मोठी कारवाई; हजार कोटींच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश

दरम्यान मुंबईतील सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम नुसार 24 कॅरेट सोने 1,32,660 रुपये , 22 कॅरेट सोने, 1,21,600 रुपये आणि 99,490 रुपये इतक्या दरात आहेत. तर दिल्लीतील सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 1,32,810 रुपये, 22 कॅरेट सोने 1,21,750 रुपये आणि 18 कॅरेट 99,640 रुपये इतक्या दरात आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात एमसीएक्स सोने 1,32,776 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number