‘मुंबईत मराठी माणसाला बाहेर काढणाऱ्यांची आता पाप फेडायची वेळ आली…’; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिरसाट म्हणाले की, 25 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांचे आता नेतृत्व राहणार नाही. येणारी मुंबई महापालिका उबठाच्या हातातून जाणार हे निश्चित आहे.
‘मुंबईत मराठी माणसाला बाहेर काढणाऱ्यांची आता पाप फेडायची वेळ आली…’; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

विजय चिडे, प्रतिनिधी 

Sanjay Shirsat On UBT Shiv Sena: मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले असून, मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. मुंबईतील ज्यांनी मराठी माणसाला बाहेर काढले, त्यांना आता पाप फेडावे लागणार आहे, असा थेट आणि जोरदार टोला त्यांनी लगावला.

उबठाच्या हातातून सत्ता जाणार – शिरसाट

शिरसाट म्हणाले की, 25 वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांचे आता नेतृत्व राहणार नाही. येणारी मुंबई महापालिका उबठाच्या हातातून जाणार हे निश्चित आहे. त्यांनी पुढे आरोप केला की काही नेत्यांनी बिल्डरांशी संगनमत करून मराठी माणसाला मुंबईबाहेर ढकलले आणि या लालसेमुळे आता त्यांना राजकीय फटका बसणार आहे.

‘मराठी-अमराठी वाद आम्ही करत नाही’

संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असे मुद्दे तेच आणतात. आम्ही मराठी-अमराठी वाद करत नाही. मुंबई निवडणुकीत अनेक नगरसेवक अमराठी आहेत, यात काही वाद नाही. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी म्हटले की, "राज ठाकरे मराठी माणसाला काही मिळत नाही म्हणून बोलत असतील. मात्र उबठा सोबत गेल्यावर त्यांना काय कळते ते बघू.'

हेही वाचा – Yugendra Pawar On Ajit Pawar : '20-20 लाख रुपये देऊन उमेदवार फोडले…'; युगेंद्र पवार यांचा अजित पवारांवर आरोप

दरम्यान, आरक्षण प्रकरणावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, 'अनेक ठिकाणी आरक्षण वाढीवर आक्षेप आहे. उद्याच्या निकालानंतरच निवडणूक प्रक्रियेचा पुढील निर्णय ठरेल. स्थगिती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.' तथापी, नगर परिषदांमध्ये 10-20 टक्के युती झाली असली तरी महापालिकेत पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

भुमरे- भाजप युती तुटण्यामागचे कारण  

संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे की, आम्ही भाजपशी बोलणी करा असे सांगितले होते. पण भाजपने ऐकले नाही. अव्वा सव्वा मागण्या झाल्यामुळेच युती तोडली गेल्याचे दिसते. अशीच परिस्थिती पुढच्या निवडणुकीतही होऊ शकते.

हेही वाचा – Chopada Election : चोपडा नगरपालिकेत राजकीय भूकंप! भाजप सोडून शिंदे गटाची काँग्रेसला साथ

शहाजी बापूंच्या नाराजीवर प्रतिक्रिया

शहाजी बापूंनी काल मनातील खदखद व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी त्यांची दखल घेतली आहे, असंही यावेळी संजय शिरसाट यांनी नमूद केलं. शिंदे-फडणवीस भेटीनंतरही काही जण इकडचे-तिकडे जात आहेत. अशी परिस्थिती राहिली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. तथापी, युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, स्थानिक परिस्थितीची मला माहिती नाही. पण पैशाने माणसे फुटतात हे खरे नाही.' तथापी, ठाकरे गटावर टीका करताना संजय शिरसाठ म्हणाले की, 'उबठांची आता राज्यात जागा राहिलेली नाही. उमेदवार मिळत नाहीत, इनकमिंग नाही, फक्त आउटगोइंग आहे. प्रसंगी ते तिकीटही विकतील.' याशिवाय, विरोधकांच्या निवडणूक आयोग भेटीवर बोलताना शिरसाठ म्हणाले की, भविष्यातील पराभवाची कारणे आता पासून शोधण्यासाठी ही धडपड सुरू आहे. 

अनंत गर्जे प्रकरण

गौरी गर्जे पालवे यांच्या मृत्यू प्रकरणावर बोलतना संजय शिरसाठ म्हणाले की, 'ताई (पंकजा मुंडे) यांनी सांगितले आहे की, या प्रकरणाची कसून चौकशी करा, आरोपीला शिक्षा द्या. मंत्र्याला जबाबदार धरणे योग्य नाही,' असंही शिरसाट यांनी यावेळी म्हटलं आहे.  

चौकशी टाळू शकत नाही 

पुण्यातील जमीन घोटाळ्याबद्दल बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, तेजवाणी कितीही टाळाटाळ करत असले तरी त्यांना चौकशीला सामोरे जावेच लागेल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. कोणाला वाचवले जाणार नाही, असे ठाम मत त्यांनी यावेळी मांडलं.  
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version