Vijay Hazare Trophy 2025 : मैदानावर काळजाचा ठोका चुकला! झेल घेताना मुंबईचा ‘हा’ स्टार खेळाडू गंभीर जखमी

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक-फलंदाजाला भीषण दुखापत झाली.
Vijay Hazare Trophy 2025 : मैदानावर काळजाचा ठोका चुकला! झेल घेताना मुंबईचा ‘हा’ स्टार खेळाडू गंभीर जखमी

Angkrish Raghuvanshi Injury: भारतीय स्थानिक क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आज मुंबई आणि उत्तराखंड यांच्यातील सामन्याला दुखापतीचे ग्रहण लागले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर क्षेत्ररक्षण करताना मुंबईचा सलामीवीर आणि यष्टीरक्षक-फलंदाज अंगकृष रघुवंशी याला भीषण दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला मैदानातून थेट स्ट्रेचरवर आणि त्यानंतर रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवावे लागले.

नेमकं काय घडलं?

मुंबईने दिलेल्या 332 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग उत्तराखंडचा संघ करत होता. डावाच्या 30 व्या षटकात उत्तराखंडचा फलंदाज सौरभ रावतने एक आक्रमक शॉट मारला. चेंडू हवेत असताना मिड-विकेट सीमारेषेवर तैनात असलेला अंगकृष चेंडू पकडण्यासाठी वेगाने धावला. चेंडू येईपर्यंत त्याने हवेत झेप (Dive) घेतली, मात्र चेंडू पकडण्याच्या नादात त्याचे नियंत्रण सुटले आणि तो जमिनीवर जोरात आदळला.

हेही वाचा – Year Ender 2025 : 2025 मध्ये ‘हे’ खेळाडू गुगलवर सर्वाधिक चर्चेत! गुगलच्या सर्च यादीत कोणाचे वर्चस्व? जाणून घ्या

अंगकृषच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत 

यावेळी अंगकृषच्या डोक्याला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली. जमिनीवर कोसळल्यानंतर त्याला असह्य वेदना होत असल्याचे पाहून मैदानातील खेळाडू आणि वैद्यकीय पथकाने धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर त्याला हालचाल करणे कठीण झाल्याने स्ट्रेचर मागवण्यात आले आणि तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : क्रिकेट विश्वात भारताच्या लेकाचा डंका ! 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा ‘या’ पुरस्काराने गौरव

अंगकृषची फलंदाजीत निराशा 

दुखापत होण्यापूर्वी फलंदाजीत मात्र अंगकृषला विशेष चमक दाखवता आली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आलेल्या अंगकृषने केवळ 11 धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्मा ‘गोल्डन डक’वर (0) बाद झाला. तरीही मुंबईने 50 षटकांत 7 बाद 331 धावांचा डोंगर उभा केला.  मुंबईकडून हार्दिक तामोरेने नाबाद 93धावांची खेळी केली, तर सरफराज खान आणि मुशीर खान या बंधूंनी प्रत्येकी 55 धावा केल्या. अंगकृष रघुवंशी हा आयपीएलमध्ये ‘कोलकाता नाईट रायडर्स’कडून (KKR) खेळलेला एक उदयोन्मुख खेळाडून आहे. त्याच्या या दुखापतीमुळे मुंबई संघाला मोठा धक्का बसला असून, त्याचे चाहते तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version