Jharkhand Student Protest Success : अखेर सरकार झुकलं! झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा विजय; मुख्यमंत्री सोरेन यांची थेट घोषणा

झारखंडची राजधानी रांचीमध्ये भरती परीक्षांबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अखेर मोठे यश आले आहे. सोमवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोठी घोषणा केली आहे.

Jharkhand Student Protest Success : अखेर सरकार झुकलं! झारखंडमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा विजय; मुख्यमंत्री सोरेन यांची थेट घोषणा

झारखंडची राजधानी रांचीमध्ये भरती परीक्षांबाबत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अखेर मोठे यश आले आहे. सोमवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मोठी घोषणा केली आहे. TDPL द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या जातील. तसेच, JSSC CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 पासून झालेल्या सर्व त्रुटींची मग त्या लहान असोत किंवा मोठ्या त्यांची चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

यावेळी 16 दिवसांपासून उपोषण करणारे देवेंद्र नाथ महतो यांनी मी उपोषण सोडणार आहे. मात्र संघर्ष सुरूच राहील, असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच TDPL शी संबंधित सर्व गोष्टी रद्द करण्यात येणार असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रांचीमध्ये जयपाल मुंडा स्टेडियममध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली. 

हेही वाचा- उत्तर अमेरिकेतील बृहन् महाराष्ट्र मंडळाचे 22 वे संमेलन सिॲटलमध्ये दिमाखात संपन्न!

मुख्यमंत्री हेमंत सोरेन काय म्हणाले?
यादरम्यान मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, "झारखंड सरकारने भरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. वरिष्ठ IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा सुधारणा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला परीक्षा रद्दबाबतचा विषय संपवण्यासाठी आम्ही मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेतली.

यावेळी आम्ही TDPL कडून घेण्यात आलेल्या परीक्षा, त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेले निकाल, निवड करण्यात आलेले उमेदवार तसेच इतर सर्व प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परीक्षा सुधारणा समिती परीक्षा प्रणालीतील त्रुटींचा आढावा घेणार असून भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सूचना देणार आहे."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number