Baramati News: "दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाली" बारामतीकरांचं पवार कुटुंबियांना पत्र; वाढत्या गुन्हेगारीबाबत मांडली कैफियत

बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना अजित पवारांनंतर बारामती पोरकी झाली अशी व्यथा मांडत बारामतीमधील विविध समस्यांवर सोशल मीडियाद्वारे एक पत्र पाठवलं आहे.

Baramati News: &quotदादांच्या निधनामुळे बारामती पोरकी झाली&quot बारामतीकरांचं पवार कुटुंबियांना पत्र; वाढत्या गुन्हेगारीबाबत मांडली कैफियत

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मित निधनानंतर बारामतीतील राजकारण तसेच पवार कुटुंबीयातील सध्या सुरु असलेल्या चर्चांचा परिणाम बारामतीतील सर्वसामान्यांवर होत असल्याची व्यथा बारामतीकरांनी मांडली आहे. बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना अजित पवारांनंतर बारामती पोरकी झाली अशी व्यथा मांडत बारामतीमधील विविध समस्यांवर सोशल मीडियाद्वारे एक पत्र पाठवलं आहे.

हेही वाचा- BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर नव्या वादात! सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी BMC खर्च करणार 25 लाख रुपये

या पत्राद्वारे बारामती मधील गुन्हेगारी आणि इतर समस्या पवार कुटुंबीयांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला गेला असून अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमधील विविध समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच जरा बारामतीकडे लक्ष द्या, अशी विनंती देखील करण्यात आली आहे. बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे असं देखील या पत्रात नमूद करण्यात आला आहे. पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांनी बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. असं आवाहन केलं आहे. 

पत्रात नेमकं काय लिहलंय?
आदरणीय पवार साहेब,
आदरणीय सुनेत्रा वहिनी,
आदरणीय सुप्रिया ताई,
पार्थ दादा, जय दादा
जरा बारामतीकडेही लक्ष द्या, ही नम्र विनंती.
दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे. आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरे जात आहे.
नगरपरिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. एखादा हुकुमशहा ज्या पद्धतीने सत्ता चालवतो, त्याच पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालवला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढत आहे, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रगात असल्यासारखा एककलमी कार्यक्रम सुरु असल्याची चर्चा आहे.
बारामती ही केवळ एक राजकीय जागा नाही; ती शरद पवार साहेबांनी आणि पवार कुटुंबांने वर्षानुवर्षे घडवलेली विश्वासाची भुमी आहे.
म्हणूनच पवार कुटुंबातील सर्व मान्यवरांना विनंती आहे की, बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगरपरिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी व्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
जनतेचा आवाज ऐका….

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number