जालना – सगे-सोयऱ्यांचा कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या उपोषणाला आता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र, पोलिसांनी आता त्यांना परवानगी नाकारल्याने आता जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. जरांगेंच्या या उपोषणाला पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण आहे. तसेच आंतरवालीतील ग्रामस्थांचाही याला विरोध होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.