Sanjay Raut : "देवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय, त्यांना दिल्लीत जावंच लागेल" संजय राऊत यांचा दावा काय?

फडणवीस यांना दिल्लीत जावे लागणार आहे, असं सांगतानाच फडणवीस दिल्लीला जाण्यासाठी तयारी करतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मी

Sanjay Raut : &quotदेवेंद्रजींना राष्ट्र साद घालतंय, त्यांना दिल्लीत जावंच लागेल&quot संजय राऊत यांचा दावा काय?

फडणवीस यांना दिल्लीत जावे लागणार आहे, असं सांगतानाच फडणवीस दिल्लीला जाण्यासाठी तयारी करतील, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला आहे. जंतरमंतरच्या प्रकरणानंतर पंतप्रधानांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे. त्यासाठी ते फडणवीसांना तिथे बोलवत आहेत असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबईत खासदार संजय राऊत म्हणाले की, “राजकारणात पतंग उडवणं हे स्वाभाविक आहे. प्रधानमंत्री रिकामडेकडे आहे का? दिल्लीला फडणवीस यांची गरज, देवेंद्र यांना दिल्ली ची आवड नसली तरी राष्ट्र त्यांना साद घालत आहे. प्रधानमंत्री यांना उत्तम कॅबिनेट बनवण्याचे आहे त्यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांना सांगतायेंत घर बदलायचं म्हणजे आवरा आवर करावी लागते. देवेंद्र यांची इथे राहण्यासाठी खूप इच्छा असेल पण त्यांच्या बाजूची लोक देव पाण्यात घालून बसलेत. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान यांना भेटतात तसे काही लोक शहा यांना भेटतात. इथेच राहणार म्हणजे इथे राहणार नाहीत. ते पुन्हा येईल म्हणत होते तेव्हा आले नाही, त्यासाठी शिवसेना फोडावी लागली, राज्यपाल मॅनेज करावे लागले. त्यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावं लागल.” 

हेही वाचा- CM Devendra Fadnavis : आता अंतिम निर्णय फडणवीसांचा! मंत्र्यांच्या निर्णयांना ब्रेक लावण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे; नव्या GR ने नेमकं काय बदललं?

“देशाच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना एकदया मंत्र्याला समवाऊन घेण्यासाठी ते करावा लागत. धर्मेंद्र प्रधान हे त्यांच्या शिक्षण खात्यात उत्तम काम करू शकले नाही म्हणून दबावा खाली राजीनामा घ्यावा लागला आणि जर त्यांना खात द्यायचं असेल तरुणांचा विचार करावा लागेल. तरुणांच्या जखमेवर मीठ चोळायचे असेल तर ते करतील. संघटनेच्या दृष्टीने महत्वाचे विनोद तावडे आहेत.” 

“राष्ट्रीय अध्यक्ष नवीन टीम बनवून काम करतो. आज कपिल सिब्बल युक्तिवाद संपवतील. फुटीर गट वेळ घेईल चार ते पाच दिवस, दिड महिन्याच्या दरम्यान लागेल. प्रधानमंत्री जनतेला नवीन विषय देतात, चांगली गोष्ट आहे. सरकारी तिजोरीतून 25 ते 30 कोटींचा धनादेश घेऊन जावे.. नाशिकच्या रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या व्यक्तीला 1 कोटी प्रत्येकी द्यावेत. मुख्यमंत्री यांनी दोनच गाड्या घेऊन महापौर उपम्हापौराना घेऊन जावे. महापौर आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.” 

“संपूर्ण महाराष्ट्रात मिंदे गट भाजप मध्ये दरी वाढत चालली म्हणून ते दरे गावाला जातात. सात वर्षाची सजा असा कायदा सरकारने मंजूर केल्यानंतर पहिली केस आहे कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. शिंदे यांनी वेगवेगळ्या पद्धतीने चाचपणी केली. दिल्लीत बैठक घेत होते. त्यांना सत्तेत जायचं होत म्हणून ते भाजपमध्ये गेले. दिल्लीतील प्रवास रात्रीचा असायचा आम्हाला वेळोवेळी माहिती मिळत होती.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number