राज्यातील 29 महापालिकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत सुरू झाली आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. यात अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी 3, ओबीसीसाठी 8 तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 महापालिकांची सोडत जाहीर झाली आहे. मुंबईच महापौरपद हे खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झालं आहे. त्यामुळे मुंबईच्या पुढच्या महिला महापौर कोण होणार? याची चर्चा सुरु झाली आहे. याआधी सुद्धा अनेक महिला नगरसेविकांनी मुंबईच महापौर भूषवलं आहे. दरम्यान जाणून घ्या याआधीच्या महिला महापौर कोण होत्या ते…
हेही वाचा- Mayor Reservation 2026 : श्रीमंत महापालिकेची चावी महिलांच्या हाती! जाणून घ्या कोणकोणत्या महानगरपालिकेवर महिलाराज
आतापर्यंतच्या कोणत्या कोणत्या माजी महिला महापौर झाल्या आहेत.
| नाव | कार्यकाळ | पक्ष |
| सुलोचना मोदी | 1956 ते 1956 | कॉंग्रेस |
| विशाखा राऊत | 1997 ते 1998 | शिवसेना |
| निर्मला सामंत प्रभावळकर | 1994 ते 1995 | शिवसेना |
| शुभा राऊळ |
10 मार्च 2007 ते 30 नोव्हेंबर 2009 2 वर्षे, 265 दिवस 2007 |
शिवसेना |
| श्रद्धा जाधव |
1 डिसेंबर 2009 ते 8 मार्च 2012 2 वर्षे, 98 दिवस 2007 |
शिवसेना |
| स्नेहल आंबेकर |
9 सप्टेंबर 2014 ते 8 मार्च 2017 2 वर्षे, 180 दिवस 2012 |
शिवसेना |
| किशोरी पेडणेकर |
22 नोव्हेंबर 2019 ते 8 मार्च 2022 2 वर्षे, 106 दिवस 2017 |
शिवसेना |