Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार; पवार कुटुंबिय बारामतीत जमण्यास सुरूवात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, बुधावारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी बारामती येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. पवार कुटुंबातील अनेक जणं परदेशात आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार आजच्या ऐवजी उद्या करण्यात येत असल्याचे समजते. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या शारदा मैदानावर अंत्यसंस्कार केले […]

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार; पवार कुटुंबिय बारामतीत जमण्यास सुरूवात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज, बुधावारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या, गुरुवारी बारामती येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. पवार कुटुंबातील अनेक जणं परदेशात आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कार आजच्या ऐवजी उद्या करण्यात येत असल्याचे समजते. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीच्या शारदा मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पवार कुटुंबिय बारामतीमध्ये दाखल झाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज, 28 जानेवारी 2026 रोजी दुःखद निधन झाले आहे. यामुळे महाराष्ट्रात 28 ते 30 जानेवारी 2026 या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : Ajit Pawar Passes Away: "आमची बारामती पोरकी झाली…'', बारामतीतील अजित पवारांचं वलय स्थानिकांच्या अनुभवातून व्यक्त

या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number