BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीत धाकधूक; फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, काय होणार निर्णय?

ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून, आज 28 डिसेंबर रोजी रात्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
BMC Election 2026: ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीत धाकधूक; फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, काय होणार निर्णय?

BMC Election 2026: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीने मुंबई महापालिका निवडणुकीचे संपूर्ण गणितच बदलून टाकले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून, आज रविवार, 28 डिसेंबर रोजी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

80 जागांवर महायुतीला फटका बसण्याची शक्यता? प्राथमिक 

अंदाजानुसार, ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील तब्बल 60 ते 80 जागांवर महायुतीच्या उमेदवारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. मराठी मतांचे होणारे ध्रुवीकरण भाजप आणि शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते. हा धोका टाळण्यासाठी 'जिंकण्याची क्षमता' (Electability) हा एकमेव निकष लावून जागावाटप करण्याचे रणनीती महायुतीने आखली आहे. 

हेही वाचा – Ravindra Dhangekar: पुणे मनपा निवडणूक; "भाजपचा प्रस्ताव अमान्य" रवींद्र धंगेकरांची बंडाची भाषा; पुण्यात महायुतीत मिठाचा खडा?

जागावाटपाचा 'फॉर्म्युला' ठरला, पण तिढा कायम 

मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जागावाटपाचा प्राथमिक आराखडा तयार झाला आहे:

भाजप: 128 जागांवर लढण्याची शक्यता.
शिवसेना (शिंदे गट): 79 जागांवर एकमत.
पेच: उर्वरित 20 ते 30 जागांवरून अद्यापही दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे.

काही जागांवर शिंदे गट ठाम असला तरी, तिथे विजयाची खात्री कमी असल्याचा अहवाल भाजपच्या वतीने सादर करण्यात आला आहे. यावर आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – Sanjay Raut on Gautam Adani : संजय राऊतांची गाडी अदानींवर घसरली, म्हणाले, 'पवारांचा पक्ष फोडण्यात…'

रणनीती बदलणार; समन्वयावर भर 

ठाकरे बंधूंच्या 'मराठी कार्ड'ला काटशह देण्यासाठी महायुती आता विशेष रणनीती आखत आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत कोणताही वाद नसून जागावाटपाचा प्रश्न लवकरच सामोपचाराने सुटेल. मात्र, ठाकरे फॅक्टरमुळे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाला काही जागांवर तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version