Mayor Election : राजकारणाचा खेळखंडोबा! आधी विरोधात लढले आता एकत्र, ठाकरेंची भाजपला साथ; महापौरही ठरला

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Mayor Election : राजकारणाचा खेळखंडोबा! आधी विरोधात लढले आता एकत्र, ठाकरेंची भाजपला साथ; महापौरही ठरला

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने थेट भाजपला पांठिंबा दिला आहे. आज सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली होती. मात्र या बैठकीत कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बाचाबाची झाल्यामुळे ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे बैठकीतून बाहेर पडले होते. त्यानंतर अवघ्या काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली.

हेही वाचा- Mohan Bhagwat : ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिला तर त्या सन्मानाची प्रतिष्ठा…’ भागवतांनी एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर दिले

राज्यात ठाकरे गट भाजपला जोरदार विरोध करत असताना चंद्रपुरात दोन्ही पक्ष एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तूळात मोठा धक्का बसला आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची होताना दिसत असताना आता ठाकरेंकडून कॉंग्रेसला मोठा धक्का मिळाला आहे. एकीकडे 66 जागांच्या सभागृहात 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरूनही अंतर्गत दुफळी आणि मित्रपक्षांच्या अटींमुळे काँग्रेसच्या सत्तेचा मार्ग खडतर झाला आहे.

हेही वाचा- Rohit Pawar : दादांच्या विमान अपघाताचे गुढ उलघडणार? रोहित पवारांच्या पोस्टमुळे राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता

तर दुसरीकडे भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रूपर महानगरपालिकेचे महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्याबाबत एकमत झाले. यावेळी भाजपकडून संगीता खांडेकर महापौर तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर असतील. यामुळे चंद्रपूर महापालिका काँग्रेसच्या हातून निसटल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन्ही पक्षाला सव्वा सव्वा वर्षे महापौर पद मिळणार असल्याची फॉर्म्युल्याची कल्पना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षासमोर मांडली. त्यामुळे सत्ता हातातून न घालवता भाजपने ठाकरे गटासोबत कॉम्प्रमाइज करत दोन्ही पक्षासाठी सव्वा सव्वा वर्षे महापौर पदाचा फॉर्म्युला ठरवला आहे. दरम्यान राज्यातली ही एकमेव महानगरपालिका आहे जिथे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number