Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल; ‘त्या’ नराधम आरोपीला ‘राजाश्रय’ दिल्याचा खळबळजनक आरोप

नाशिकमधील अशोक खरात नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Sushma Andhare : सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल; ‘त्या’ नराधम आरोपीला ‘राजाश्रय’ दिल्याचा खळबळजनक आरोप

Sushma Andhare on Rupali Chakankar : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ‘बॉम्ब’ टाकला आहे. नाशिकमधील अशोक खरात नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले असून, या आरोपीला चाकणकर यांचा राजकीय वरदहस्त असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणातील धक्कादायक माहितीमुळे महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अशोक खरात प्रकरण आणि आक्षेपार्ह व्हिडिओ
नाशिकमधील अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली आहे. सुषमा अंधारे यांनी असा दावा केला आहे की, रूपाली चाकणकर या अशोक खरातच्या ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संचालिका आहेत. इतकेच नाही तर, चाकणकर यांनी या आरोपीची पाद्यपूजा केल्याचे आणि त्याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे अनेक व्हिडिओ व फोटो उपलब्ध असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : “महाराष्ट्राची ‘एपस्टिन फाईल’ उघडकीस” ज्योतिषी अशोक खरातच्या अटकेनंतर राऊतांचा घणाघात

हनीट्रॅप कनेक्शन आणि पेनड्राइव्हचा मुद्दा
या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकच्या गाजलेल्या हनीट्रॅप प्रकरणाशी जुळलेले असण्याची शक्यता अंधारे यांनी वर्तवली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गेल्या अधिवेशनात एका पेनड्राइव्हचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये हनीट्रॅप संदर्भातील माहिती असल्याचे म्हटले होते. अटक करण्यात आलेला आरोपी अशोक खरात हा देखील नाशिकचाच असल्याने आणि त्याच्याकडे 58 व्हिडिओ सापडल्याने, या प्रकरणाचा त्या पेनड्राइव्हशी काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पदाचा दुरुपयोग आणि सुनेत्रा पवारांना प्रश्न
सुषमा अंधारे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सवाल विचारला आहे की, “अशा वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या व्यक्तीला महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर ठेवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची काय राजकीय अपरिहार्यता आहे?” आयोगाच्या पदाचा दुरुपयोग करून शोषित महिलांना न्याय देण्याऐवजी शोषण करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असेल, तर चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. यापूर्वी एका संपादकाने या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला असता, चाकणकरांनी त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतल्याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Anil Parab On Yogesh Kadam: ‘आमचा सरकारवर विश्वास नाही…’; अनिल परब यांनी योगेश कदम यांना घेरलं, सभागृहात नेमकं काय घडलं? वाचा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version