Sunita Ahuja On Govinda Affair : ‘ती त्याच्यावर प्रेम करत नाही, तिला फक्त…’; सुनीता आहुजाचा गोविंदाच्या अफेअरवर खळबळजनक खुलासा

गेल्या काही काळापासून गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, आता खुद्द सुनीता आहुजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
Sunita Ahuja On Govinda Affair : ‘ती त्याच्यावर प्रेम करत नाही, तिला फक्त…’; सुनीता आहुजाचा गोविंदाच्या अफेअरवर खळबळजनक खुलासा

Sunita Ahuja On Govinda Affair : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील कौटुंबिक कलह आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही काळापासून गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, आता खुद्द सुनीता आहुजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, गोविंदाचे ज्या महिलेसोबत नाव जोडले जात आहे, ती अभिनेत्री नसून केवळ पैशांच्या मोहापायी त्याच्या मागे लागली असल्याचा गंभीर आरोप सुनीता यांनी केला आहे.

2025 हे वर्ष आहुजा कुटुंबासाठी अत्यंत चढ-उतारांचे राहिले. 2024 पासूनच या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. मध्यंतरी गणेशोत्सवाच्या काळात गोविंदा आणि सुनीता एकत्र दिसल्याने या अफवांना पूर्णविराम मिळेल असे वाटले होते. मात्र, एका मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे सूत जुळल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. यावर मौन सोडत सुनीता यांनी स्पष्ट केले की, 'तो दावा चुकीचा आहे. ती महिला अभिनेत्री नाही.' 

हेही वाचा – Don 3: 'धुरंधर'च्या यशानंतर 'डॉन 3' मधून रणवीर सिंगची 'एक्झिट'; आता 'या' चित्रपटात साकारणार भूमिका

चौथ्या महिलेला स्थान नाही 

'ईटाइम्स'शी संवाद साधताना सुनीता यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्या म्हणाल्या, 'माझ्यासाठी 2025 हे वर्ष खूप मानसिक त्रासाचे होते. गोविंदा ज्या महिलेला डेट करत आहे, ती अभिनेत्री नाही कारण अभिनेत्री अशा खालच्या स्तराला जात नाहीत. ती त्याच्यावर प्रेम करत नाही, तिला फक्त त्याचे पैसे हवे आहेत. गोविंदाने हे समजून घ्यायला हवे की त्याच्या आयुष्यात आई, पत्नी आणि मुलगी या तीनच महत्त्वाच्या महिला आहेत. कोणाही चौथ्या महिलेला तिथे स्थान असण्याचा अधिकार नाही.'

हेही वाचा – Kapil Sharma Show Controversy: कपिल शर्माचा शो कायद्याच्या कचाट्यात! मुंबई हायकोर्टात खटला दाखल; कारण काय?

सुनीता यांनी गोविंदाला सल्ला दिला आहे की, त्याने त्याच्या अवतीभवती असणाऱ्या 'चापलूस' लोकांपासून दूर राहावे आणि पुन्हा एकदा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. एकीकडे वैयक्तिक आयुष्यात वादळ असताना सुनीता यांनी आपल्या व्यावसायिक यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 2025 मध्ये त्यांनी स्वतःचे YouTube चॅनेल सुरू केले, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, 2026 मध्ये सुनीता यांना काय बदलायचे आहे असे विचारले असता, त्या म्हणाल्या, 'मला 2026 मध्ये माझे जीवन बदलायचे आहे. मला गोविंदाने हे सर्व वाद संपवावेत अशी इच्छा आहे. मला 2026 मध्ये एक आनंदी कुटुंब हवे आहे. मला आशा आहे की हे लवकरच घडेल.' सुनीता आहुजा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडल्याने आता गोविंदा यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version