Gulabrao Patil : "हे भाजपवाले जसं आमचे लोक फोडतात, तसं तुम्ही विद्यार्थी फोडा" गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

जळगावमध्ये बोलताना मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना अजब सल्ला दिल्याचे पाहायला मिळत आहे.

Gulabrao Patil : &quotहे भाजपवाले जसं आमचे लोक फोडतात, तसं तुम्ही विद्यार्थी फोडा&quot गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

 शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पक्षांमधील फुटीचा दाखला देत शिक्षकांना दिलेल्या सल्ल्यावरून आता महायुतीमध्येच मतभेद समोर येताना दिसत आहेत. जळगावमध्ये बोलताना मराठी शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना अजब सल्ला दिल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, “हे भाजपवाले जशी आमचे लोक फोडतात.. या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात..त्याचप्रमाणे शिक्षकांनी देखील इंग्रजी शाळांमध्ये पोरं फोडले पाहिजे आणि मराठी शाळांमध्ये आणलं पाहिजे. मराठी शाळेतील पटसंख्या टिकवणे फार मोठे चॅलेंज आहे.. आणि त्यामध्ये कुटुंब नियोजनाची व्याख्या हा देखील मोठा विषय आहे.”

हेही वाचा- Supriya Sule vs Sunetra Pawar: “वहिनींनी सुनावल्यानंतर आम्ही बोलणारच नाही” पवार कुटुंबातली दरी वाढली; सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे वाद उफाळला

असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महायुतीतील काही नेत्यांकडून नाराजी व्यक्त  केली जाऊ शकते अशी शक्यता आहे. यामुळे सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.  गुलाबराव पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत वातावरण तापण्याची शक्यता आहे.  

यानंतर आमदार रवी राणा यांनी गुलाबराव पाटलांच्या या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राजकारणातली घाण शिक्षणात आणि विद्यार्थ्यांमध्ये आणू नका, असा थेट इशारा रवी राणा यांनी दिला आहे. यावेळी रवी राणा म्हणाले की, “विद्यार्थ्यांसंदर्भात असे फोडाफोडीचे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आणि निषेधार्ह आहे. राजकारण शिक्षणात नको राजकारणाची परिस्थिती आधीच दूषित झाली आहे, त्यात आता निष्पाप विद्यार्थ्यांना आणि शिक्षण क्षेत्राला ओढू नये. राज्याला पुढे नेणाऱ्या चांगल्या नेतृत्वाच्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी ते ठामपणे उभे आहेत, मात्र अशा वक्तव्यांचे समर्थन कधीही करणार नाहीत.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number