IND vs SL Women’s T20 : स्मृती-शफालीचा जागतिक विक्रम! T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली जोडी

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T-20 मालिकेत या जोडीने अशी कामगिरी केली आहे, जी आजवर महिला क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही देशाच्या जोडीला जमलेली नाही.<br/>
IND vs SL Women’s T20 : स्मृती-शफालीचा जागतिक विक्रम! T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारी पहिली जोडी

IND vs SL Women's T20 : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या T-20 मालिकेत या जोडीने अशी कामगिरी केली आहे, जी आजवर महिला क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही देशाच्या जोडीला जमलेली नाही.

3,000 धावांचा टप्पा ओलांडणारी 'पहिली' जोडी

दोघींनी मिळून महिला T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारीत 3,000 धावांचा हिमालयीन टप्पा पार केला आहे. या मैलाच्या दगडापर्यंत पोहोचणारी ही जगातील एकमेव जोडी ठरली आहे. सध्या या जोडीच्या नावावर एकूण 3,107 धावा जमा आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज एलिसा हिली आणि बेथ मुनी (2,720 धावा) या जोडीला मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.

हेही वाचा – U19 World Cup 2026 : 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; 'या' खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधारपदाची धुरा

श्रीलंकेविरुद्ध धावांचा पाऊस

मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतरही भारतीय सलामीवीरांनी मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. स्मृती आणि शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी 162 धावांची अभूतपूर्व भागीदारी करत श्रीलंकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. या जबरदस्त सुरुवातीमुळे भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली.

हेही वाचा – Gautam Gambhir: गौतम गंभीरचे टेन्शन वाढले; कसोटी प्रशिक्षकपदासाठी BCCI कडून 'या' दिग्गजाला ऑफर, पाहा कोणाची लागणार वर्णी?

कांगारूंचा विक्रम मोडला, आता नजर अव्वल स्थानाकडे

या खेळीदरम्यान स्मृती-शफाली जोडीने T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चौथ्यांदा शतकी भागीदारी नोंदवली. यासह त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली आणि बेथ मुनी यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. आता त्यांच्यापुढे केवळ यूएईच्या ईशा ओझा आणि तीर्था सतीश (6 शतकी भागीदारी) यांचे आव्हान उरले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version