Harman Sidhu Death: पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का; गायक हरमन सिद्धू यांचे रस्ते अपघातात निधन

मानसा-पटियाला रस्त्यावर ख्याला गावाजवळ सिद्धू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि हरमन सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला.<br/>
Harman Sidhu Death: पंजाबी संगीतविश्वाला मोठा धक्का; गायक हरमन सिद्धू यांचे रस्ते अपघातात निधन

Harman Sidhu Death: पंजाबी संगीतसृष्टीतील चर्चित गायक हरमन सिद्धू यांचे शनिवारी मानसा जिल्ह्यातील ख्याला गावाजवळ भीषण रस्ते अपघातात निधन झाले. केवळ 37 वर्षांच्या वयात त्यांची जीवनयात्रा दुर्दैवी पद्धतीने संपली. या दुर्घटनेने त्यांचे चाहते, सहकलाकार आणि संपूर्ण संगीत उद्योग शोकसागरात बुडाला आहे. प्राप्त माहितीनुसार, मानसा-पटियाला रस्त्यावर ख्याला गावाजवळ सिद्धू यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि हरमन सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबावर दु:खाचा डोंगर

अचानक झालेल्या या अपघाती निधनाने सिद्धू यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते.

'पेपर ते प्यार'ने मिळाली लोकप्रियता

हरमन सिद्धू यांनी पंजाबी संगीत उद्योगात आपले खास स्थान निर्माण केले होते. मिस पूजा सोबतचे त्यांचे लोकप्रिय गाणे “पेपर ते प्यार” त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवून देणारे ठरले. त्यांच्या गाण्यांमध्ये कौटुंबिक नाती, सामाजिक विषय आणि भावनात्मक बोल असल्याने तरुण पिढीला त्यांची गाणी खूप आवडत असतं.  

हेही वाचा – Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स स्पर्धेत मोठी दुर्घटना; मिस जमैका स्टेजवरून पडली, रुग्णालयात उपचार सुरू

नव्या इनिंगची तयारी पण…  

कुटुंबीयांनी सांगितले की हरमन सिद्धू गेल्या काही महिन्यांपासून नव्या संगीत प्रकल्पांसाठी खूप मेहनत घेत होते. काही गाण्यांचे शूटिंग पूर्ण झाले होते. वर्षअखेरीस म्हणजे 2025 च्या शेवटी दोन नवीन गाणी रिलीज होणार होती. पण त्याआधीच हा दुर्दैवी अपघात झाला.

हेही वाचा – Akshay Kumar : ती बुडत होती… तिला वाचवायला अक्षय कुमारने स्वतःचा जीव धोक्यात घातला, कोण आहे ती?

शूटिंगवरून परतताना घडला अपघात

सिद्धू मानसा येथे त्यांच्या नव्या गाण्यांच्या शूटिंगसाठी गेले होते. काम संपवून घरी परतताना त्यांची कार अपघातग्रस्त झाली. पंजाबी संगीतविश्वातील एक प्रतिभावान आवाज अशा रीतीने हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून शोकसंदेश व्यक्त करत सिद्धू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version