मुंबई : भाजपापाठोपाठ शिंदे सेनेने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे. मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरीतून तर त्यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही बंधू एकाचवेळी विधानसभेत आपले नशीब आजमावणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ही जागा रवी राणा यांच्या पक्षाला हवी होती, मात्र शिंदे सेनेने तिथे अभिजित अडसूळ यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेची पहिली यादी – ४५ उमेदवार
वरळीतून राज्यसभा खासदाराला आमदारकीचे तिकीट
वरळी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वरळीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे विरुद्ध शिवसेनेचे मिलिंद देवरा अशी लढत होणार आहे.
शिंदे शिवसेनेचे ४५ उमेदवार जाहीर
नऊ मंत्र्यांना पुन्हा संधी
मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
मुंबईतील सहा आमदारांना पुन्हा संधी दिली
संजय गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत नाव
जय महाराष्ट्र हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत… pic.twitter.com/pym7h5XiF7 — Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) October 22, 2024
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.