Shivsena Sulekha Chavan: ठाकरेंनंतर शिंदे गटालाही मोठा धक्का! ठाण्यात शिंदेसेनेतील नगरसेविकेचे पद रद्द, नेमके कारण काय?

ठाणे: काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा गटातील मुंबईच्या महापौर विशाखा राऊत यांचे पद सुद्धा रिक्त झाले होते. परंतु उबाठा गटातील नगरसेवकांसह आता शिंदे गटातील नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. कारण

Shivsena Sulekha Chavan: ठाकरेंनंतर शिंदे गटालाही मोठा धक्का! ठाण्यात शिंदेसेनेतील नगरसेविकेचे पद रद्द, नेमके कारण काय?

ठाणे: काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा गटातील मुंबईच्या महापौर विशाखा राऊत यांचे पद सुद्धा रिक्त झाले होते. परंतु उबाठा गटातील नगरसेवकांसह आता शिंदे गटातील नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. कारण ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5 (अ) मधील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवक पद रिक्त झाल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी 16 जून 2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवक पद आपोआप संपुष्टात आल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या मात्र त्याचे जात प्रमाणपत्र फोल असल्याचे समोर आले आहे. याविषयी आदिवासी संघटनांनी त्यांच्या विरोधात विराट मोर्चा काढला होता, तपासणीदरम्यान त्यांनी दाखवण्यात आलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी त्यांचे पद रिक्त केले असून त्याजागी पुन्हा निवडणूक करण्याची घोषणा केली आहे.

सुलेखा चव्हाण यांचे पद रिक्त का झाले ?
माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या त्या पत्नी सुलेखा चव्हाण यांनी निवडणुकीवेळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सादर केले होते.तसेच ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 अ मधून सुलेखा सुधाकर चव्हाण या बिनविरोध निवडून आल्या होत्या. परंतु  धुळे येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यानंतर ठाणे पालिका आयुक्तांनी कोकण विभागीय आयुक्तांना सुलेखा चव्हाण यांचे पद रिक्त झाल्याचे कळवले.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : "आज भाऊ संकटात आहे, ताईकडे…", जेवणाच्या आमंत्रणानंतर जरांगेंचं अमृता फडणवीस यांना उत्तर; नेमकं काय म्हणाले?

शिंदेसेना धोक्यात?
निवडणुकीत बिनविरोध जिंकून नगरसेविका झालेल्या चव्हाण यांना काही महिन्यांतच पद गमवावे लागले. जात प्रमाणपत्राच्या वादातून झालेल्या या कारवाईमुळे शिंदेसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी शिंदेसेनेकडे बहुमत असताना देखील एका नगरसेविकेचे पद गेल्याने विरोधकांना सत्ताधारी पक्षावर टीका करण्याची संधी मिळाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number