Naresh Mhaske On Sanjay Raut : "…तेव्हा राऊतांनी रश्मी ठाकरेंना शिवीगाळ केली" नरेश म्हस्केंचा राऊतांवर गंभीर आरोप

राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं म्हणून संजय राऊत यांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Naresh Mhaske On Sanjay Raut : &quot…तेव्हा राऊतांनी रश्मी ठाकरेंना शिवीगाळ केली&quot नरेश म्हस्केंचा राऊतांवर गंभीर आरोप

नरेश म्हस्के यांचे संजय राऊत यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं म्हणून संजय राऊत यांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटातील नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या या आरोपांमुळे शिवसेनेतील  राजकारण पुन्हा चर्चेत आलं आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, म्हस्के यांनी केलेल्या या गंभीर आरोपांवर संजय राऊत यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.   

यावेळी नरेश म्हस्के म्हणाले की, “राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊत यांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. हे सर्व शिवसेनेला माहीत आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी विरोध करा यासाठी पवईतील एका हॅाटेल मध्ये संजय राऊतांनी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणार मी पहिला आहे. त्यानंतर मी कधी मातोश्रीवर गेलो नाही. त्यानंतर मला वर्षावर पण बोलवले होते. पक्षाला एकनाथ शिंदे यांची गरज आहे असं मी राऊतांना म्हणालो होतो. उद्धव ठाकरेंनी नरेश म्हस्केला विधान परिषदेचं तिकीट दिलं नाही असं तुम्ही मला म्हणता.” 

हेही वाचा- Shivsena Hearing In Supreme Court : शिवसेनेच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर राऊत आणि म्हस्के यांच्यात ‘टशन’; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

“आमची मुठ्ठी तुम्ही बंद राहूया.. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर तुम्ही मला रोज फोन करून काय काय बोलत होता हे कॅाल रेकॅार्ड जाहीर करा.. संजय राऊत हे फेकूचंद आहेत. त्यांनी आत्ता पर्यंत कितीवेळा गौप्यस्फोट केलाय. त्यांना भोंगा म्हणायला सुरुवात मी केली. म्हणून माझ्यावर त्यांचा राग आहे.” 

“मी एकनाथ शिंदे विरोधात लिहलेलें एक ही पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन. आणि नाही दाखवलं तर संजय राऊतांनी राजीनामा द्यावा. पवई हॅाटेल मध्ये एक बैठक घेतली. राऊतांनी मुख्यमंत्री पदासाठी नाव पुढे केलं होते. राऊतांचे प्रेम बेगडी आहे. तुम्हीच पक्षाचं वाटोळं केले. कॉंग्रेस सोबत नेण्यास तुम्ही भाग पाडलं. शिवसैनिकांच्या शिव्या शाप तुम्हाला भोगावे लागेल. मुख्यमंत्री पदाची माळ स्वतःच्या गळ्यात येईल या स्वार्थी ने संजय राऊत यांनी काम केले. पक्ष हातात घेण्याची इच्छा राऊतांची होती.”

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number