Nagar Parishad Election Results: शिंदे गटाची ‘सुपरफास्ट’ घौडदौड! पालिका निवडणुकीत मारली बाजी

या निवडणुकीत सर्वात मोठी चुरस भाजप आणि शिंदे गट यांच्यातील थेट लढतीत पाहायला मिळाली. विशेषतः भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात शिंदे गटाने अनपेक्षित मुसंडी मारली आहे.
Nagar Parishad Election Results: शिंदे गटाची ‘सुपरफास्ट’ घौडदौड! पालिका निवडणुकीत मारली बाजी

Nagar Parishad Election Results: राज्यातील नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकांच्या निकालांनी महायुतीमधील सत्तेचे समीकरण अधिक रंजक वळणावर आणून ठेवले आहे. संख्येच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून आपले अव्वल स्थान कायम राखले असले, तरी विजयाची खात्री (स्ट्राइक रेट) आणि राजकीय प्रभावाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोकणात भाजपला 'धोबीपछाड'; शिंदेंच्या शिलेदारांचे वर्चस्व

या निवडणुकीत सर्वात मोठी चुरस भाजप आणि शिंदे गट यांच्यातील थेट लढतीत पाहायला मिळाली. विशेषतः भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात शिंदे गटाने अनपेक्षित मुसंडी मारली आहे. तथापी, कणकवली आणि मालवण या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी शिंदे गटाने भाजपच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला. नितेश राणे यांच्या मतदारसंघात मिळालेला हा विजय शिंदे गटाच्या वाढत्या ताकदीचे निदर्शक मानला जात आहे.

खेडमध्ये ऐतिहासिक विजय

योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने खेड नगरपरिषदेत 21-0 असा 'क्लीन स्वीप' देत विरोधकांचा सुफडा साफ केला. यामुळे माधवी भुटाला यांचा नगराध्यक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापी, सांगोला आणि महाडमध्ये अंतर्गत संघर्षात शिवसेनेची सरशी झाली. महायुतीमधील मित्रपक्षांमध्येच काही ठिकाणी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. 

हेही वाचा – Katol Nagarparishad Election Result 2025: अनिल देशमुखांची राजकीय गुगली! स्वतःच्या मुलाचा विरोध डावलून केलेली आघाडी ठरली यशस्वी

सांगोल्यामध्ये शहाजीबापू पाटील विरुद्ध भाजपचे जयकुमार गोरे असा सामना रंगला होता. येथे बापुंनी आपली ताकद सिद्ध करत 17 जागांवर एकहाती विजय मिळवला आणि भाजपला रिकाम्या हाती परत पाठवले. तथापी, महाडमध्ये भरत गोगावले (शिवसेना) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी – अजित पवार गट) यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढाईत गोगावले यांनी बाजी मारली.

हेही वाचा – Muktainagar Election Results 2025 : जळगाव-धुळ्यात राजकीय भूकंप! मुक्ताईनगरमध्ये खडसेंना धक्का, धरणगावात मंत्र्यांचा बालेकिल्ला ढासळला

ठाकरे गटापेक्षा पाचपट अधिक यश

संघटनेच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे गटासाठी ऐतिहासिक ठरली आहे. पक्षाने प्रथमच 135 जागा लढवून 50 पेक्षा अधिक नगराध्यक्ष पदे पटकावली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, शिंदे गटाने मिळवलेल्या जागांची संख्या ही उद्धव ठाकरे गटाच्या तुलनेत पाचपट अधिक आहे. महाविकास आघाडीला एकत्रितपणे जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत, त्यापेक्षा जास्त यश एकट्या शिंदे सेनेने मिळवले आहे. या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, राज्याच्या राजकारणात भाजप मोठा भाऊ असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि थेट लढतींमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट भाजपला आणि विरोधकांना कडवे आव्हान देण्यास सक्षम आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version