Pawar Family Meeting : पुण्यात ‘मोदी बाग’ येथे पवार कुटुंब एकत्र; शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर प्रथमच…

गेल्या काही काळातील राजकीय तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंब एका छताखाली येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Pawar Family Meeting : पुण्यात ‘मोदी बाग’ येथे पवार कुटुंब एकत्र; शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर प्रथमच…

Sharad Pawar Calls Emergency Family Meeting : पुणे शहरातून राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या ‘मोदी बाग’ या निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंबाची तातडीची बैठक बोलावली आहे. गेल्या काही काळातील राजकीय तणाव आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंब एका छताखाली येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ही बैठक केवळ कौटुंबिक आहे की यातून काही मोठी राजकीय दिशा ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार या बैठकीला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या अपघाताचे गूढ कायम
या बैठकीचे सर्वात महत्त्वाचे आणि संवेदनशील कारण म्हणजे अजित पवार यांच्या निधनाला आता 3 महिने पूर्ण झाले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास अद्याप सुरू असून, CID तपासात अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सापडूनही त्यातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. या प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवारांनी हा पुढाकार घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

बैठकीला उपस्थित असणारे दिग्गज
या बैठकीला पवार कुटुंबातील सर्व महत्त्वाचे चेहरे उपस्थित राहणार आहेत. यामध्ये शरद पवारांसह प्रतापराव पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. तसेच शर्मिला पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, खासदार पार्थ पवार, सदानंद सुळे आणि अभिजीत पवार हे देखील या बैठकीसाठी पुण्यात दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक सदस्य एकत्र येण्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – Parth Pawar VSR Plane : ज्या विमानामुळे दादांचा मृत्यू, त्याच कंपनीच्या विमानातून पवार कुटुंबीयांचा प्रवास

लग्नकार्याची चर्चा की राजकीय रणनीती?
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाच्या नियोजनासाठी आणि स्नेहभोजनासाठी आयोजित करण्यात आली आहे. मात्र, राजकारणातील जाणकारांच्या मते, अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राजकीय पोकळीचा आणि कुटुंबाच्या भविष्यातील वाटचालीचा विचार या बैठकीत होऊ शकतो. एका बाजूला लग्नाची तयारी आणि दुसरीकडे अपघाताचा संशयास्पद तपास, अशा दोन भिन्न पार्श्वभूमीच्या विषयांवर चर्चा होण्याची आहे.

तपास यंत्रणांवर वाढणारा दबाव
अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने उलटूनही तपास यंत्रणांच्या हाती काहीच न लागल्याने पवार कुटुंबामध्ये काहीसे असंतोषाचे वातावरण आहे. या बैठकीनंतर शरद पवार तपासाबाबत काही मोठी मागणी करणार का, किंवा सरकारवर दबाव आणणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कौटुंबिक स्नेहभोजनासाठी झालेली ही बैठक आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवू शकते किंवा आगामी राजकारणाला दिशा देणारी ठरू शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा – Sanjay Raut: ‘मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही…’; रिक्षा-टॅक्सीच्या मुद्द्यावर राऊत आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version