NCP Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या पक्षात काहीतरी वेगळं घडतंय? राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर ज्येष्ठ नेत्याचा विरोध?

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या दोन्हा राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह पाहायला मिळत आहेत.

NCP Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या पक्षात काहीतरी वेगळं घडतंय? राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर ज्येष्ठ नेत्याचा विरोध?

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या दोन्हा राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह पाहायला मिळत आहेत. एकीकडे पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरु असताना आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पक्षातूनच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून आक्षेप घेत विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून ही मोठी बातमी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Dattatray Bharne : आमची लग्न जुळेना, पाऊस पडेना, कोणी मुलगी देईन…; बीडच्या तरुण शेतकऱ्याने मांडणी कृषीमंत्र्यांसमोर व्यथा

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी 9 जुलैला वकिलांमार्फत सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस बजावली. यावेळी त्यांनी म्हटलं की, '26 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेली राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक पुन्हा घेण्यात यावी. ही निवडणूक अवैध असून याबाबत स्वतंत्र आणि नि:पक्षपाती असा निवडणूक अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत निवडणूक घेण्यात यावी. तोवर राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारीत ॲाफिस बेअररची यादी ही रद्द समजावी', अशी मागणी करण्यात आली आहे. 

यानंतर सुनील तटकरे यांनी देखील बैठक घेतली होती. तर सुनेत्रा पवारांनी बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधननंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षासह उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरही सुनेत्रा पवार यांची सर्वांच्या सहमतीने अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र आता त्यांच्याच अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर पक्षातून आक्षेप घेण्यात आल्याने हा विषय चर्चेला कारण ठरत आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number