NDA Seat Sharing in Bihar: बिहार निवडणुकीपूर्वी बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. भाजप आणि जनता दल (युनायटेड) जेडीयू या दोन प्रमुख सहयोगींना समान जागा देण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्ष प्रत्येकी 101 जागांवर लढणार आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) ला 29 जागा, तर जितन राम मांझी यांच्या हम (एचएएम) आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्र लोक जनशक्ति मोर्चा (आरएलएम) ला प्रत्येकी 6 जागा देण्यात आल्या आहेत.
याबाबत भाजप नेते धर्मेंद्र प्रधान आणि जेडीयू नेते संजय झा यांनी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी म्हटलं की, एनडीएतील सर्व सहयोगींमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात जागावाटप निश्चित झाले असून, सर्व पक्ष आता एकजुटीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापनेसाठी सज्ज आहेत. जागावाटपाच्या या फॉर्म्युल्यानुसार, जेडीयूला 14 जागा, भाजपला 9 जागा, आणि एचएएमला 1 जागा सोडावी लागली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत, जेडीयूने 21 जागा, तर भाजपने 20 जागा गमावल्या आहेत. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत एलजेपीसाठी लढवलेल्या जागांवरून जेडीयूचा कोणतीही जागा न सोडण्याचा आग्रहही या वेळी मागे घेण्यात आला आहे.
हेही वाचा – Rashid Cablewala: कुख्यात गुंड रशीद केबलवालाला अझरबैजानमध्ये अटक, भारतात आणण्याची तयारी सुरू
कोणाला किती जागा?
भाजप (BJP) – 101 जागा
जदयू (JDU) – 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा
हेही वाचा – Rainfall Alert : सावधान! IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा; पुढील 7 दिवस 'या' राज्यांमध्ये धो-धो कोसळणार
धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एनडीएच्या सर्व सहयोगींनी एकमताने जागावाटप पूर्ण केले आहे. बिहार पुन्हा एनडीए सरकारसाठी तयार आहे. तर संजय झा यांनी नमूद केले की, आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. सर्व कार्यकर्ते आणि नेते उत्साहात आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहेत. बिहारमधील आगामी निवडणुकांपूर्वी एनडीएमध्ये झालेला हा तोडगा महत्त्वाचा मानला जात असून, त्यामुळे आघाडी आता एकजुटीने प्रचार मोहीमेला सज्ज झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.