Amit Thackeray MNS : "तुम्ही कांड करता आणि केस कार्यकर्त्यांवर होते" राज ठाकरेंचे एकेकाळचे निकटवर्तीय अमित ठाकरेंवर बरसले

एकेकाळी राज ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले संतोष धुरी यांनी अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 

Amit Thackeray MNS : &quotतुम्ही कांड करता आणि केस कार्यकर्त्यांवर होते&quot राज ठाकरेंचे एकेकाळचे निकटवर्तीय अमित ठाकरेंवर बरसले

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबाबत आक्षेप घेतल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले होते. या घटनेच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने राज ठाकरे यांच्या दादरमधील शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे भाजयुमोचे कार्यकर्ते शिवाजी पार्क परिसरातही पोहोचू शकले नाहीत.

त्यानंतर माहीम परिसरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मनसे आणि भाजप युवा मोर्चामध्ये काल झालेल्या राड्यानंतर आज संपूर्ण दादर परिसरात काही फलक लावण्यात आले आहेत. यादरम्यान एकेकाळी राज ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले संतोष धुरी यांनी अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 

हेही वाचा- Ravindra Chavan: आंदोलन फसलं, आता प्रदेशाध्यक्षांचा दणका! कृष्णराज महाडिकांना रवींद्र चव्हाणांनी सुनावलं; ‘काल आलेला पोरगा…’

यावेळी भाजपचे नेते संतोष धुरी म्हणाले की, "ज्या पक्षाने चूक केली त्याच पक्षाने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. भांडण केली, मारामारी केली. आदेश दिल्यानंतर सैनिक धावत गेले आणि हे स्वतः बंगल्यामध्ये बसले. कामाला सैनिकांना लावलं. निष्पाप सैनिकांना कामांना लावता. नरेंद्र मोदींचा फोटो काढायला तुम्ही सांगितलं आणि त्याची केस कार्यकर्त्यांवर पडली. आता केस ते लढवणार. तुम्ही स्वतः सांगायला पाहिजे जे झाले ते चूक झाले."

"तुमची तुलना संभाजी महाराजांसोबत झाली हे चूक झाले, हे सुद्धा सांगा. तुम्ही जर म्हणत असाल याच्या शेजारी त्याचा फोटो नको, त्याच्या शेजारी याचा फोटो नको, तर मग  शिवाजी पार्क मध्ये लागलेले बॅनर बघा. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा फोटो आहे आणि त्याच ठिकाणी अमित ठाकरेंचा फोटो आहे. आपली तुलना कुठल्या महापुरुषासोबत केली गेली नाही पाहिजे, हे तुम्हाला कळले पाहिजे. शिवाजी पार्कवर तुमचे पोस्टर तुमचे कार्यकर्ते लावतात की आणखी कोण, यावर तुमचं लक्ष नाही का?"

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number