Sanjay Raut On Shivsena UBT MP Meeting : "पुढच्या तीन दिवसांत…" ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीनंतर राऊतांकडून मोठी अपडेट

आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर' या गुप्त मोहिमेची जोरदार चर्चा रंगली आहे.

Sanjay Raut On Shivsena UBT MP Meeting : &quotपुढच्या तीन दिवसांत…&quot ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीनंतर राऊतांकडून मोठी अपडेट

आज मातोश्रीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर' या गुप्त मोहिमेची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आले आहेत, परंतु त्यापैकी 7 खासदार हे सातत्याने सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा राजकीय गोटातून केला जात आहे. याचपार्श्वभूमिवर ठाकरे गटाकडून बैठक बोलवण्यात आली. यावेळी या बैठकीला 9 पैका 7 खासदार उपस्थित असल्याची चर्चा सुरु होती. याचपार्श्वभूमिवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

हेही वाचा- Uddhav Thackeray MP Meeting Matoshree : मातोश्रीवरील बैठकीला येताना खासदाराच्या कारचा अपघात! ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या

यावेळी संजय राऊत म्हणाले की, "आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती. त्या बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर उरलेले पाच खासदार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. त्यातले मी तुम्हाला नावं घेऊन सांगतो, ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झाले आहेत."

"त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. तेथून ओमराजे उपस्थित राहिले. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहेत. ते शिर्डीच्या रुग्णालयातून उपस्थित होते. नागेश आष्टीकर यांचे चिरंजीव हे विधानपरिषदेच्या निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यात ते गुंतलेले आहेत. आष्टीकरांनही या बैठकीत भाग घेतला. वाशीमचे खासदार संजय देशमुख यांच्या घरी मंगल कार्याचे काम सुरू आहे."

"मुलीच्या लग्नाबाबत बैठक होती. ते ही ऑनलाईन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते. नऊच्या नऊ खासदार हे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, ते पुढच्या तीन दिवसांत प्रत्यक्ष मातोश्रीवर येऊन ठाकरे यांची भेट घेतील.", अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number