शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सध्या त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. आजारपणामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून ब्रेक घेतला आहे. काल त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. अशातच आता त्यांची रुग्णालयातून नवीन पोस्ट समोर आली आहे.यामध्ये ते लिखाण करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी लिहिले कि, हात लिहिता राहिला पाहिजे, कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता!
हात लिहिता राहिला पाहिजे कसेल त्याची जमीन
लिहील त्याचे वृत्तपत्र
हा आमच्या पिढीचा मंत्र होता! pic.twitter.com/AowQ9MhfLN — Sanjay Raut (@rautsanjay61) November 6, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.