रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा ही जोडी चांगलीच फेमस आहे. बॉलिवूडमध्ये या जोडीबद्दल नेहमा चर्चा सुरू असते, परंतु त्यांच्यातील वाद आता इन्स्टाग्रामवरील त्यांच्या या वादाची चर्चा सुरू आहे. दोघही नेहमी सोशल मिडीयावर प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. आता मात्र त्यांच भांडण सर्वांच्या समोर आलं आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न झालं. ते अनेकवर्ष एकमेकांसोबत डेट करत होते. लग्नानंतरही सोशल मिडीयावर त्यांची नेहमीच चर्चा असते. रितेशने रविवारी त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून ‘प्रत्येक रागावलेल्या महिलेच्या मागे एक पुरुष असतो ज्याला अजिबात माहीत नसतं की त्याची चूक काय झाली.’ अशी पोस्ट शेअर केली. यामध्ये एक फोटोही आहे. ज्यामध्ये एक रागावलेली महिला दिसते तर तिच्या मागे उभा असलेल्या पुरुषाच्या चेहऱ्यावर ती नक्की का रागावली आहे हेच कळत नाही. यामध्ये त्याने जेनेलियाला टॅग केलं आहे.
.@geneliad pic.twitter.com/Rc4eeHvwIr — Riteish Deshmukh (@Riteishd) September 22, 2019
तर यावर जेनेलियानेही रितेशला चांगलंच उत्तर दिले आहे. ‘मी सर्वसामान्यपणे नवऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो.’ असं म्हणत तीने रितेशला टॅग केलं आहे. दोघांच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. गृहकलह आता ऑनलाइन झाला आहे अशा कमेंट यावरती केल्या आहेत.
.@Riteishd https://t.co/1SfRHrNbNZ pic.twitter.com/iLb79z9dcy — Genelia Deshmukh (@geneliad) September 22, 2019
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.