Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange Patil: "विनंती करतो की…" जरांगेंच्या टीकेमुळे बावनकुळे भावूक; माध्यमांशी बोलताना डोळ्यात आलं पाणी

मनोज जरांगे पाटलांच्या टीकेमुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पत्रकारांना उत्तर देताना बावनकुळे यांच्या डोळयात पाणी देखील आले होते.

Chandrashekhar Bawankule On Manoj Jarange Patil: &quotविनंती करतो की…&quot जरांगेंच्या टीकेमुळे बावनकुळे भावूक; माध्यमांशी बोलताना डोळ्यात आलं पाणी

मनोज जरांगे पाटलांच्या टीकेमुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पत्रकारांना उत्तर देताना बावनकुळे यांच्या डोळयात पाणी देखील आले होते. माझ्यावर व्यंग करून त्यांना आनंद मिळत असेल तर मिळू द्या, मी काहीच बोलणार नाही. माझ्या घरी बायको, मुले, बहीण, माझं कुटुंब आहे त्यांनाही याचा त्रास होतो. त्यांना जर माझ्यावर बोलून आनंद मिळत असेल तर मी त्याच्यावर काही बोलणार नाही. असं म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसांपासून कुणबी प्रमाणपत्र रद्द करावयास लावल्याच्या आरोपात मराठा आरक्षक मनोज जरांगे पाटील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकांची तोफ डागत आहेत. याचपार्श्वभूमिवर पुण्यात बोलत असताना बावनकुळे भावुक झाले. 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "माझ्यावर टीका करून न्याय मिळत असेल तर त्यांनी खुशाल टिंगल टवाळी करावी,काय गैरसमज झाला आहे माहिती नाही. मी कधी जाती पात करत नाही. आम्ही महसूलकडून कुणबी जात प्रमाण पत्र दिला आहे महसूल खात्याने एवढं काम केल्यावर जर व्यंग होत असेल तर याला काही अर्थ नाही,22 लक्ष प्रमाणपत्रांमधील एक प्रमाणपत्र चुकीचा आला आहे त्यावरही मी चौकशी लावली होती तेही क्लिअर झालं आहे, आताही कुणबी प्रमाणपत्र येत आहे ते रोज देत आहे. तरीही माझ्यावर व्यंग करून आनंद मिळत असेल तर त्यांनी आनंद व्यक्त करावा. माझे आणि जरांग्यांचे बोलणे अनेकदा झाले आहे एका प्रमाणपत्रामुळे गैरसमज झाले आहेत. व्हॅलिडीटी माझं काम नाही ते समाजकल्याणकडे आहे." 

हेही वाचा- Mallikarjun Kharge : 'हा माझा अपमान…'; शुद्धीकरणावरून मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेत संताप, जे. पी. नड्डाचंही उत्तर

पुढे ते म्हणाले "ओबीसी आंदोलकांना विनंती करतो कोणीही रस्त्यावरील आंदोलन करू नका सरकार म्हणून विनंती करतो की रस्त्यावर आंदोलन करू नका, यातून सामाजिक वाद होतील कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं काही करू नका. कायदेशीर लढा लढता येतो, ओबीसी समाजाने कोणताही वाद करू नये. मी कधी या वादात नाही, माझी पत्नी कुणबी आहे, आम्ही एकत्रित राहतो, सुनबाई मराठी आहे, आम्ही कुणबी, तेली, मराठा वाद करत नाही. आमचा पण परिवार आहे." 

पुढे बावनकुळे म्हणाले, "कास्ट व्हॅलिडीटीमध्ये काय झाला असेल तर मला माहिती नाही. सरकारी पक्ष लोकांनी व्यवस्थित वागले पाहिजे,माझ्या कुटुंबात पण सगळे आहेत. मी कुठल्याही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. मी केस चालवली तर राजकीय होईल, अप्पर प्रधान सचिवांकडे मुंडवा जमीन प्रकरण वर्ग केला आहे,जमीन सरकार जमा झाली आहे,ते निर्णय घेतील. अजून एक बदली यादी आली आहे,40 लोकाची यादी आहे,घोटाळा आरोपींना या विभागात नोकरी करता येणार नाही. राज्यात मुंडवा जमीन घोटाळ्यासारखे घोटाळे होणार नाहीत."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number