Ravindra Chavan: आंदोलन फसलं, आता प्रदेशाध्यक्षांचा दणका! कृष्णराज महाडिकांना रवींद्र चव्हाणांनी सुनावलं; ‘काल आलेला पोरगा…’

राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर आंदोलनाचा प्रयत्न फसल्यानंतर भाजयुमो प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीरपणे संयमाचा सल्ला दिला.

Ravindra Chavan: आंदोलन फसलं, आता प्रदेशाध्यक्षांचा दणका! कृष्णराज महाडिकांना रवींद्र चव्हाणांनी सुनावलं; ‘काल आलेला पोरगा…’

मनसे आणि भाजप युवा मोर्चामधील अलीकडच्या राजकीय वादानंतर आता भाजपच्या अंतर्गत बैठकीतही या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याच्या प्रयत्नानंतर भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांना आता स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीरपणे कानपिचक्या दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

शिवतीर्थबाहेर आंदोलनाचा प्रयत्न फसला

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबाबत आक्षेप घेतल्यानंतर भाजप युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याची तयारी करण्यात आली होती.मात्र, परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनीही परिसरात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावल्याने आंदोलनकर्त्यांना पुढे जाता आले नाही. अखेरीस पोलिसांनी महाडिक यांना माहीम परिसरात ताब्यात घेतल्याने आंदोलन प्रत्यक्षात होऊ शकले नाही.

रवींद्र चव्हाणांचा युवा मोर्चाला स्पष्ट संदेश

या घटनेनंतर भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. प्रत्येक वक्तव्यावर आंदोलन करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. युवकांना संघर्षाच्या नावाखाली अडचणीत आणण्यापेक्षा त्यांना सक्षम आणि शिक्षित करण्यावर भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देण्याऐवजी संयमाने भूमिका घेण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

वादाची सुरुवात कशी झाली?

या संपूर्ण वादाची सुरुवात पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातून झाली. पाहणीदरम्यान अमित ठाकरे यांनी भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोदी यांचा फोटो काढून टाकल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पुणे पोलिसांनी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर भाजप युवा मोर्चाने आंदोलनाची घोषणा केली आणि दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला.

राजकीय चर्चांना उधाण

या संपूर्ण घडामोडींनंतर कृष्णराज महाडिक यांच्यावर दुहेरी दबाव आल्याची चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला आंदोलन अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाही, तर दुसऱ्या बाजूला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेही सार्वजनिक मंचावरून संयमाचा सल्ला दिला. यामुळे आगामी काळात भाजप युवा मोर्चा आणि मनसे यांच्यातील राजकीय संघर्ष कोणत्या दिशेने जातो, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number