Raju Shetti on Maharashtra Budget 2026 : ‘पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात…’, कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजू शेट्टींचा संताप

या घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Raju Shetti on Maharashtra Budget 2026 : ‘पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात…’, कर्जमाफीच्या मुद्द्यावर राजू शेट्टींचा संताप

आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या घोषणेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. 

हेही वाचा – Uddhav Thackeray on Maharashtra Budget 2026 : ‘ठेकेदारांसाठी ठोस योजना पण शेतकऱ्यांसाठी फसवा अर्थसंकल्प…’, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल 

पुढे ते म्हणाले, ‘बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही’. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version