Operation Tiger : उद्धवसेनेचे नगराध्यक्ष सात नगरसेवकांसह आज शिंदेसेनेत प्रवेश करणार?; ‘ऑपरेशन टायगर’ सक्रीय

विजय चिडे, प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेला मोठा झटका बसणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्धवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे सात नगरसेवकांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. नगराध्यक्ष ठोंबरे यांनी समर्थक नगरसेवकांसह शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय दोन […]

Operation Tiger : उद्धवसेनेचे नगराध्यक्ष सात नगरसेवकांसह आज शिंदेसेनेत प्रवेश करणार?; ‘ऑपरेशन टायगर’ सक्रीय

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर :  छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेला मोठा झटका बसणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीच्या राजकारणात मंगळवारी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्धवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे सात नगरसेवकांसह शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. नगराध्यक्ष ठोंबरे यांनी समर्थक नगरसेवकांसह शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वीच घेतल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या दोन बैठका झाल्या होत्या. शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणि विविध विकासकामांबाबत ठोंबरे यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्यांना शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे प्रवेश लांबणीवर पडला होता. मात्र, आता अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे ठोंबरे समर्थकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : शिंदेसेनेत जोरदार इनकमिंग, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या हाती धनुष्यबाण?; सुनेत्रा पवारांना मोठा धक्का?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number