Uddhav-Raj Thackeray Interview : ‘अतिक्रमण, वाहतुककोंडी, आता बस…’; शहरातील वाढत्या लोकसंख्येवर मध्यमवर्गीय मुंबईकर नाराज, यावर काय म्हणाले राज-उद्धव?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत. या निमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर दोघे भाऊ उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत त्या दोघांची संयुक्तित मुलाखत सामना ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ही मुलाखत खासदार संजय राऊत आणि निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. […]

Uddhav-Raj Thackeray Interview : ‘अतिक्रमण, वाहतुककोंडी, आता बस…’; शहरातील वाढत्या लोकसंख्येवर मध्यमवर्गीय मुंबईकर नाराज, यावर काय म्हणाले राज-उद्धव?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे हे पक्ष एकत्रितरित्या लढणार आहेत. या निमित्ताने तब्बल 20 वर्षानंतर दोघे भाऊ उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. निवडणुकांच्या रणधुमाळीत त्या दोघांची संयुक्तित मुलाखत सामना ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. ही मुलाखत खासदार संजय राऊत आणि निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. या मुलाखतीत विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. 

हेही वाचा : Thackeray Brother Interview : ‘शाळेबाहेरील पानटपऱ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचलंय, हे गंभीर आहे’; सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर राज-उद्धव बरसले

महेश मांजरेकर म्हणाले की, मुंबईत राहणारा मध्यम वर्गीय माणूस संकटांचा सामना करतोय. मोठमोठ्या टॉवर्समध्ये 24 तास पाणी असतं. छोट्या इमारतींमध्ये 1-2 तास पाणी येतं. आज मी घराबाहेर पडलो की, जिथे 20 मि. प्रवासाला लागायची तिथे एक तास लागतो. लोकांना आता सांग बस, जेवढे मुंबईत आले ते राहू देत. आता ते मुंबईकर झाले. पण आता नव्याने येणाऱ्यांसाठी जागा नाही. मुंबईत सध्या 51 लाख गाड्या आहेत. वाहतुक कोंडीची समस्या बिकट आहे. 

यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. चार प्रकारच्या जागा असतात. केंद्राची, राज्याची, महानगरपालिकेची आणि खासगी जागा असतात. उदा. गोदरेजची खासगी जागा आहे, तिथे एकही झोपडी पाहायला मिळणार नाही. परंतू केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या जागांवर याला आईबापचं नाही. अनेकदा येथील अनधिकृत बांधकाम पाडलं गेलं. नंतर तिथला अधिकारी त्यांना मदत करतो. अशासाठी या गोष्टींवर जो वचक हवा. तो वचक येणं गरजेचं आहे. तो उद्या आम्ही सत्तेत आलो तर आणू, दुसरं कोणी राज्यात सत्तेत येतील त्यांनी आणावा. मुंबईत आता जागा संपलेली आहे. मुंबईत प्रदुषणाची परिस्थिती बिकट आहे. मात्र दिल्लीची आताची अवस्था पाहता त्याहून खराब आहे. तिथे केंद्र आणि राज्य दोन्ही यंत्रणा आहेत. राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला हवं सत्तेवर असता कामा नये, सत्तेवर प्रेम करायचं. आणि राज्याचा बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. दुर्दैवाने आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाहीत. त्यांनी मुंबई शहरासाठी, येथील लोकांसाठी काहीही वाटतं नाही. ते फक्त काँट्रॅक्टरसाठी काम करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number