Raj Thackeray: ‘सभेसाठी शिवतीर्थावर या, तुमच्याशी भरभरुन बोलायचंय…’; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आमंत्रण

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक संयुक्त सभेसाठी राज ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरून निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे.<br/>
Raj Thackeray: ‘सभेसाठी शिवतीर्थावर या, तुमच्याशी भरभरुन बोलायचंय…’; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आमंत्रण

Raj Thackeray:  ‘तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे, भरभरून बोलायचं आहे. त्यासाठी सर्वांनी शिवतीर्थावर या,’ अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक संयुक्त सभेसाठी राज ठाकरेंनी स्वतः मैदानात उतरून निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे.

वेळ कमी, काम जास्त; राज ठाकरेंचे आवाहन

मंगळवारी कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातील मनसे व उद्धवसेनेच्या शाखांना भेटी देताना राज ठाकरे बोलत होते. ‘आता वेळ कमी असल्यामुळे सभा मर्यादित आहेत, पण फिरणं जास्त आहे. त्यामुळे 11 तारखेला शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा,’ असे आवाहन त्यांनी केले. या सभेची नेमकी वेळ आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर केली जाणार आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : ‘काकांच्या पुण्याईनेच माझं लय बरं चाललंय..’; पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची गुगली

मुंबईत ‘ठाकरे’ ब्रँडची एकच महासभा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, मुंबईत ठिकठिकाणी सभा घेण्याऐवजी शिवतीर्थावर एकच मोठी संयुक्त सभा घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईत ठाकरेबंधूंची एकच संयुक्त सभा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे. जास्त सभा घेण्याऐवजी उद्धवसेना व मनसेच्या शाखा-शाखांना भेटी देऊन जनसंपर्कावर भर द्यावा यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे एकमत झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

हेही वाचा – Latur Election 2026 : मुख्यमंत्री लातूर दौऱ्यावर अन् काँग्रेसचा कडकडीत ‘बंद’; विलासराव देशमुखांविरोधातील वक्तव्यामुळे रणकंदन

सत्ताधाऱ्यांकडून अडथळ्यांचा प्रयत्न?

संजय राऊत यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत सभा घेण्यासाठी मैदान उपलब्ध करून दिले जात नाहीये. मनसे आणि उद्धवसेनेच्या सभांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत, असे राऊत म्हणाले. मात्र, या सर्व अडथळ्यांना पार करून ठाकरे बंधू आता थेट मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version