शिवसेना भवनात ‘राज’दर्शन; 19 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन आणि जुन्या संघर्षाच्या आठवणींना फुटला पाझर

राज ठाकरेंच्या आगमनावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. राज यांच्या उपस्थितीमुळे आज शिवसेना भवनात एक वेगळेच चैतन्य जाणवत आहे. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची ही एक नवी नांदी आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना भवनात ‘राज’दर्शन; 19 वर्षांनंतर ऐतिहासिक पुनरागमन आणि जुन्या संघर्षाच्या आठवणींना फुटला पाझर

Uddhav Thackeray Raj Thackeray at Shivsena Bhawan : महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल 19 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवले. निमित्त होते शिवशक्ती युतीचा (शिवसेना UBT, मनसे आणि राष्ट्रवादी SP) संयुक्त 'वचननामा' प्रकाशित करण्याचे. या वास्तूमध्ये पुन्हा प्रवेश करताना राज ठाकरे काहीसे गहिवरले होते आणि त्यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींचा पदर उलगडला.

"संजय राऊत वारंवार 20 वर्षांचा उल्लेख करत आहेत, मला तर वाटतंय की मी तुरुंगातून सुटून आलोय," अशा मिश्किल टिप्पणीने राज ठाकरेंनी भाषणाची सुरुवात केली. नवीन शिवसेना भवनाची रचना पाहताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या सर्व आठवणी या जुन्या इमारतीशी निगडित आहेत. यावेळी त्यांनी 1977 सालच्या एका घटनेचा विशेष उल्लेख केला. जेव्हा जनता पक्षाची लाट होती आणि शिवसेना भवन नवीनच बांधून झाले होते, तेव्हा एका सभेनंतर या वास्तूवर दगडफेक झाली होती; त्या संघर्षाच्या काळापासून आपण या वास्तूचे साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज यांच्या उपस्थितीमुळे..

राज ठाकरेंच्या या आगमनावर उद्धव ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, राज यांच्या उपस्थितीमुळे आज शिवसेना भवनात एक वेगळेच चैतन्य जाणवत आहे. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाची ही एक नवी नांदी असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्या चव्हाण यांच्यासह सर्व नेत्यांनी मिळून हा वचननामा तयार केला असून, हा केवळ शब्दांचा खेळ नसून महाराष्ट्राच्या विकासाचा खरा शब्द असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हेही वाचा – Raj – Udhhav Thackeray: "मोदींनी गंगा आणली, मिंधेंनी समुद्र बांधला" उद्धव – राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी

आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी संयुक्तपणे हा वचननामा मांडला. यामध्ये प्रामुख्याने मुंबईसह इतर 28 महापालिकांमधील नागरी सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच मराठी भाषेचे जतन आणि सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न सोडवणे हे या युतीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ' एकाच मंचावर
शिवसेना भवनातील या ऐतिहासिक भेटीमुळे ठाकरे कुटुंबातील भावनिक बंध पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आले आहेत. अनेक वर्षांनंतर 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ' एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. जुन्या संघर्षाचा काळ आठवत राज ठाकरेंनी दिलेली साक्ष आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला विकासाचा शब्द, यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या युतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: "धमकी देणाऱ्या नार्वेकरांना निलंबित करा " शिवसेना भवनातून उद्धव ठाकरेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version