Raj Thackeray: राज ठाकरे आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार; काय आहे नेमकं प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत.
Raj Thackeray: राज ठाकरे आज पुन्हा ठाणे न्यायालयात हजर राहणार; काय आहे नेमकं प्रकरण?

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे रेल्वे न्यायालयात हजर राहणार आहेत. 2008 सालच्या बहुचर्चित रेल्वे भरती आंदोलन प्रकरणातील सुनावणीसाठी ते न्यायालयात उपस्थित राहतील. यापूर्वी झालेल्या सुनावणीत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

प्रकरणाची पार्श्वभूमी आणि आरोप
हे प्रकरण 2008 मधील असून, रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांविरुद्ध मनसेने कल्याण स्थानकावर तीव्र आंदोलन केले होते. “मराठी तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्या आहेत,” अशी भूमिका मांडत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान रेल्वे मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले होते.

हेही वाचा – Vidhan Parishad Oath Ceremony : विधानभवनात 10 नव्या शिलेदारांचा शपथविधी; नीलम गोऱ्हे सलग पाचव्यांदा शपथ घेऊन रचणार इतिहास!

न्यायालयीन घडामोडी – 
या प्रकरणात राज ठाकरेंसह सात मनसैनिकांना अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. काही सुनावणींना आरोपी गैरहजर राहिल्याने न्यायालयाने अटक वॉरण्ट बजावले होते, जे राज ठाकरेंच्या वकिलांनी कायदेशीर अर्ज देऊन रद्द करून घेतले. 11 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या सुनावणीत राज ठाकरेंनी न्यायाधीशांसमोर स्पष्ट केले होते की, “मला हा गुन्हा मान्य नाही.” तसेच, न्यायालयीन प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते.

सुनावणीचे महत्त्व 
सुरुवातीला या प्रकरणाचा तपास कल्याण न्यायालयात सुरू होता, मात्र नंतर तो ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात आता अंतिम टप्प्यातील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते आणि राज ठाकरे आपली बाजू कशी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version