सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर दाखल, फडणवीसांसोबतच्या भेटीने चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरे अचानक ‘वर्षा’वर दाखल, फडणवीसांसोबतच्या भेटीने चर्चांना उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी ‘वर्षा’ येथे पोहोचले. या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या या भेटीमागे शिवाजी पार्क येथील जिमखान्याशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या सोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईकदेखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीत संबंधित विषयावरही चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रातील काही प्रमुख नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे फडणवीसांसोबतची त्यांची अचानक झालेली भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, या बैठकीचा नेमका अजेंडा अद्याप अधिकृतपणे समोर आलेला नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरूनही राज ठाकरे यांनी अलीकडेच आक्रमक भूमिका घेतली होती. महामार्गाच्या पाहणीदरम्यान त्यांनी प्रकल्पाला होणाऱ्या विलंबावर प्रश्न उपस्थित केले होते. राज ठाकरे यांनी या प्रकल्पाच्या विलंबामागे राजकीय हस्तक्षेप असल्याची टीका केली होती. त्यामुळे आजच्या भेटीत महामार्गाच्या कामाचा मुद्दाही चर्चेला आला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number