Railway Special Service: भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नव्या सुविधा लागू करत आहे. याच पार्श्वभूमीवर स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता स्लीपर कोचमधील प्रवाशांनाही स्वच्छ व सॅनिटाइज्ड बेडशीट आणि उशा मिळणार आहेत. दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागाने जाहीर केले की 1 जानेवारी 2026 पासून ही सेवा अधिकृतपणे सुरू होईल. एसी डब्यात मिळणाऱ्या बेडरोलची (बेडशीट, उशी, ब्लँकेट, टॉवेल) सुविधा आतापर्यंत स्लीपर क्लासला लागू नव्हती. मात्र आता पहिल्यांदाच स्लीपर प्रवाशांसाठीही पेड बेसिसवर ही सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवासी इच्छेनुसार कोच अटेंडंटकडून बेडशीट किंवा बेडरोल खरेदी करू शकतील. हे साहित्य स्वच्छ, सॅनिटाइज्ड आणि एकदाच वापरण्यासाठी असेल.
किती शुल्क लागेल ?
चेन्नई विभागाने जाहीर केलेल्या किमती जाहीर खालीलप्रमाणे आहेत:
फक्त बेडशीट : 20
फक्त उशी व कव्हर : 30
बेडशीट + उशीचे कव्हर + उशी : 50
एसी क्लासप्रमाणे या शुल्काचा समावेश तिकिटात नसेल. प्रवाशांनी प्रत्यक्ष कोच अटेंडंटला पैसे दिल्यावरच साहित्य मिळेल.
सुरुवातीला फक्त 10 गाड्यांमध्ये सुविधा
ही सेवा सर्व गाड्यांमध्ये तत्काळ लागू होणार नाही. सुरुवातीला दक्षिण रेल्वेच्या निवडक 10 गाड्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सेवा सुरू केली जात आहे. प्रतिसाद चांगला मिळाल्यास ही सुविधा देशभरातील इतर गाड्यांसाठीही लागू केली जाईल.
हेही वाचा – Share Market News : ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या शेअर्सना येणार उसळी? गुंतवणूकदारांना होऊ शकतो मोठा फायदा
या 10 गाड्यांमध्ये मिळणार बेडशीट-उशी सेवा
निलगिरी सुपरफास्ट एक्सप्रेस — 12671 / 12672
मंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस — 12685 / 12686
मन्नारगुडी एक्सप्रेस — 16179 / 16180
तिरुचेंदूर सुपरफास्ट एक्सप्रेस — 20605 / 20606
पालघाट एक्सप्रेस — 22651 / 22652
सिलंबू सुपरफास्ट एक्सप्रेस — 20681 / 20682
तांबरम–नागरकॉइल सुपरफास्ट एक्सप्रेस — 22657 / 22658
त्रिवेंद्रम सुपरफास्ट एक्सप्रेस — 12695 / 12696
अलेप्पी सुपरफास्ट एक्सप्रेस — 22639 / 22640
मंगलोर एक्सप्रेस — 16159 / 16160
Chennai Division Launches Sanitized Bedrolls from 1st Jan 2026
Chennai Division, Southern Railway, is introducing a first-of-its-kind service to enhance comfort and hygiene for Sleeper Class passengers.
Travellers can request sanitized, bedrolls on an On-Demand – On-Payment basis pic.twitter.com/3rH7hqBLwZ — DRM Chennai (@DrmChennai) November 28, 2025
ही सुविधा का महत्त्वाची?
रेल्वेच्या या सुविधेमुळे लांब पल्ल्याच्या स्लीपर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच प्रवाशांना स्वच्छ, हायजेनिक साहित्य उपलब्ध होणार. तथापी, यामुळे एसी-स्लीपरमधील सुविधा तफावत मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांना कमी किमतीत आरामदायी प्रवासाची संधी मिळणार आहे. दक्षिण रेल्वेचा हा निर्णय मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद ठरत असून 2026 पासून स्लीपर क्लासचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.