Rahul Gandhi : राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ; ’29 एप्रिलनंतर…’ केंद्र सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या दाव्याने खळबळ; ’29 एप्रिलनंतर…’ केंद्र सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi Fuel Price Hike Claim : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीचा काळ असल्याने सध्या केंद्र सरकारने किमती स्थिर ठेवल्या आहेत, मात्र 29 एप्रिलनंतर सामान्य जनतेला महागाईचा मोठा तडाखा बसेल, असा दावा त्यांनी केला आहे. ‘मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार आहे,’ अशी पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर करत राहुल गांधींनी या संभाव्य दरवाढीबद्दल जनतेला इशारा दिला आहे.

लूटमार आणि नफेखोरीचा आरोप
आपल्या आरोपांमध्ये राहुल गांधींनी जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींचा संदर्भ दिला आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त होते, तेव्हा मोदी सरकारने त्याचा फायदा जनतेला देण्याऐवजी स्वतःकडे नफा ठेवला आणि आता तेल महाग झाल्यावर त्याचा बोजा थेट नागरिकांवर टाकला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या काळात दिलेली तात्पुरती सूट आता समाप्त होणार असून, जनतेची ‘स्वस्त दरांच्या’ नावाखाली लूट केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. पश्चिम बंगालसह इतर राज्यांमधील निवडणुकांच्या धामधुमीत या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

हेही वाचा – West Bengal Election 2026: पश्चिम बंगालच्या 142 मतदारसंघांत आज ‘हाय व्होल्टेज’ लढत; दिग्गज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण
राहुल गांधींचे हे सर्व दावे केंद्र सरकारने अधिकृतपणे फेटाळून लावले आहेत. इंधन दरवाढीचा सध्या कोणताही विचार नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि इतर तांत्रिक बाबींवर अवलंबून असतात. इंधनाचे दर निवडणुकीशी जोडणे चुकीचे असून अशा प्रकारच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे 29 एप्रिलनंतर दरवाढ होणार की नाही, याबाबत आता केंद्र विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगला आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन हा नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे. राहुल गांधींनी नेमकी 29 एप्रिल ही तारीख देऊन सरकारला धारेवर धरल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विरोधकांच्या मते, सरकार निवडणुका जिंकेपर्यंत दरवाढ रोखून धरते, तर सरकारच्या मते हा केवळ राजकीय स्टंट आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात कच्च्या तेलाचे दर वाढलेले असताना, भारत सरकार या परिस्थितीचा सामना कसा करते आणि खरोखरच मे महिन्याच्या सुरुवातीला दरवाढ होते का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Nitin Gadkari: पेट्रोलच्या गाड्या आता भंगारात जाणार? नितीन गडकरी म्हणाले, ‘त्यांना कोणतेही भविष्य नाही…’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version