राज्यसभा निवडणूक उमेदवारीसाठी सादर केलेल्या अर्जासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची मालमत्ता अधिक असल्याचे समोर आले आहे. यावेळी शरद पवार आणि पत्नी प्रतिभा पवार यांच्याकडे एकूण 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे.तर पार्थ पवार यांच्याकडे एकूण 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
शरद पवार यांची एकूण मालमत्ता 60.71 कोटी रुपये इतकी असून त्यात जंगम मालमत्ता 44.72 कोटी रुपये आणि रोख रक्कम 1,25,000 रुपये एवढी आहे. तसेच बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी 11.66 कोटी रुपये, समभाग, मुच्युअल फंड्स आदी 27 कोटी रुपये, सोने व चांदीचे दागिने व वस्तू 3.85 कोटी रुपये आहेत. शरद पवार यांच्याकडे स्थावर मालमत्तेमध्ये बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य 15.99 कोटी रुपये आहे. तसेच सुप्रिया एन्टरप्रायझेसचे सुमारे 49 लाख 84 दायित्व (भागीदारी फर्ममध्ये कॅपिटल बॅलन्स) आहे.
हेही वाचा- Aditya Thackeray: मविआमध्ये मिठाचा खडा? राज्यसभेवरून आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली मनातील ‘सल’; शरद पवार यांच्या उमेदवारीवर मोठं विधान
दुसरीकडे पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता 88 कोटी 33 लाख रुपये असून त्यात जंगम मालमत्ता 11 कोटी 35 लाख 44 हजार रुपये आहे. बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी तीन कोटी 68 लाख रुपये, तर समभाग, म्युच्युअल फंड्स आदी एक कोटी 17 लाख रुपये इतके आहे. तसेच सोने-चांदीचे दागिने, इतर वस्तू एक कोटी 31 लाख रुपये इतक्या आहेत. स्थावर मालमत्ता बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर आदींचे सध्याचे अंदाजे बाजारमूल्य : 76 कोटी 98 लाख रुपये आणि बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज : 92 लाख 48 हजार रुपये इतके आहेत. व्यावसायिक गुंतवणुकीमुळे पार्थ पवार यांची मालमत्ता शरद पवार यांच्यापेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. राज्यसभा निवडणुकांसाठी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. या सगळ्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोरेगाव येथील जमीन घोटाळ्यासंदर्भात अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांचे प्रकरण लावून धरलं होतं यावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.