Manoj Jarange On Sanjay Jadhav : ‘शिंदेंची सभा होणारच’ जरांगेंची मागणी झिडकारली, बंडू जाधवांना जरांगेंचा मोठा इशारा; म्हणाले, "मी यांचा बदला घेणारच"

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि कुणबी जात प्रमाणपत्रावरून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यात राजकीय संघर्ष पेटला.

Manoj Jarange On Sanjay Jadhav : ‘शिंदेंची सभा होणारच’ जरांगेंची मागणी झिडकारली, बंडू जाधवांना जरांगेंचा मोठा इशारा; म्हणाले, &quotमी यांचा बदला घेणारच&quot

न्या.संदीप शिंदे समीतीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे 58 लाख मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी द्या या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केलं आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.कालपासून जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे आज देखील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास राजकीय नेत्यांना घराबाहेर पडणं ही मुश्किल करू, असा इशारा अंतरवाली सराटीत आलेल्या मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषण सुरूच राहणार असून सरकारने मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत आंदोलन करण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी तारीख ठरवली जाणार असल्याची घोषणा जरांगेंनी केलीय.ही तारीख ठरवण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी राज्यभरातील मराठ्यांनी अंतरवालीत येण्याचं आवाहन जरांगेंनी केलं आहे. असं असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि कुणबी जात प्रमाणपत्रावरून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यात थेट राजकीय संघर्ष पेटला आहे. जरांगे पाटील यांनी परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा तातडीने रद्द करण्याचा इशारा फोनवरून दिला होता. मात्र, ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी परभणीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले.

हेही वाचा- Manoj Jarange Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंचा परभणीच्या मेळाव्याला तीव्र विरोध; शिंदेंचा दौरा रद्द न केल्यास दिला 'हा' गंभीर इशारा

या मेळाव्याची गेल्या कित्येक दिवसांपासून तयारी सुरू होती. एकनाथ शिंदे मराठवाडा दौऱ्यावर असून ते  या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. खासदार बंडू जाधव यांनी जरांगेंची ही मागणी फेटाळून लावत "सभा नियोजित वेळेनुसार होणारच," अशी ठाम भूमीका घेतली आहे. असं असताना आता जरांगे पाटील यांनी बंडू जाधवांचा 'कार्यक्रम' करणार असल्याचा इशारा दिला आहे. आपण परभणीत गेल्यानंतरही कार्यक्रम सुरूच पाहिजे, मग गठला पाहिजे मग त्याने पुढे जाऊन दाखवावं. माझा आणि शिंदेंचा सामना झाल्यास ते मुंग्यांसारखे पळतील, दूरवरून कुणीही छाती ठोकतं, सामना झाल्यानंतर मजा येते. कितीही ताकद लाव, कितीही गुंडांगर्दी कर, याचं संपलं आता, बंडू जाधव यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे.  

यावेळी जरांगेनी म्हटलं की, "मला कार्यक्रम आहे म्हणून काल सांगायला हवं होतं. तुम्ही कुणीही गाड्या काढू नका आमच्या दोनच गाड्या पळू शकतात. कार्यक्रम प्रतिष्ठा नव्हती मराठे प्रतिष्ठा होती. नेत्यांना बाप मानणारे काही जण असतात. कुणी काही उपटत नाही त्यांना मुंबईत पळून लावलं परभणी काय आहे? मुंबईत मी यांचा बदला घेणारच आहे. तिथे जाऊन शिकार हाती लागली पाहिजे, तिथल्या मराठ्यांना मी पुढे घालत नाही,मी स्वतः पुढे होतो. मी जर पुढे झालो तर शिकार हाती लागली पाहिजे आणि शिकार पळून  गेली तर? सर्वस्व स्वतःच आहेत हा या राजकारण्यांचा माज मला उतरवायचा आहे.लातूर,नांदेड आणि परभणीच्या मराठ्यांनी शांत राहावे,बंडूने खूप मोठी चूक केली आहे. मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे केले. आता बंडूचे दुःखाचे दिवस सुरू झाले."

हेही वाचा- Eknath Shinde Joins Thane Marathon: ठाणे मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदेंचीही एन्ट्री! 30 हजार धावपटूंसोबत उपमुख्यमंत्री उतरले ट्रॅकवर; व्हिडिओ व्हायरल

"मराठ्यांनीच बंडू जाधवची इज्जत वाढवली. त्याने कार्यक्रम घ्यायला नको होता. परभणी जिल्ह्यातील सर्वच मराठ्यांनी शांत राहावे मी आलो तरच ताकद लावा. त्यांना बॉंड्री सील करू द्या की आणखी काही करू द्या,सगळं उपटून फेकतो फक्त शिंदेच्या येण्याचा आणि माझा टाईप मॅच झाला पाहिजे. परभणीत जाऊन शिंदेंचा आणि माझा सामना झाला पाहिजे,शिंदे तिथे भेटला पाहिजे मग त्यांना सांगतो, शिंदेंचा टाईम मला मॅच करून द्या. तिथे जाऊन मराठ्यांचा फक्त स्टंट आणि शो होईल,मराठे स्टंट करतात असा संदेश जाईल. मी परभणीत जाईपर्यंत रात्रीचे 10 वाजतील तोपर्यंत शिंदे जाऊन झोपून राहील. बंड्या खंडीच्या वरणात मुतला, बंडू जाधव तुला आणि एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम घेण्याचा परीणाम भोगावे लागतील. गेलो तर पोलीस काय करणार आहेत? पोलिसांना भत्ते नाहीत,पोलिसांचे हाल आहेत. मी फडणवीसांना सोडणार नाही,पोलिसांनी कितीही मुंबईच्या बॉड्री सील केल्या तरी मराठे मुंबईत शिरणार. परभणीचा खासदार गेंडा टक्कलसिंग."
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number