Palghar Hospital Row News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह इतर 7 जण पक्षातून निलंबित; कारण काय?

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाने पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन सांखे, राहुल घरत, रोहित गावित यांच्यासह सात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित

Palghar Hospital Row News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांसह इतर 7 जण पक्षातून निलंबित; कारण काय?

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाने पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन सांखे, राहुल घरत, रोहित गावित यांच्यासह सात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. या प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल असून राहुल घरत यांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित 16 जणांची चौकशी सुरू आहे, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच पक्ष मारहाणीचे समर्थन करत नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी कारवाई केली. 

नेमके काय घडले?

पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमध्ये, जखमी गोविंदांच्या डिस्चार्ज व वैद्यकीय बिलांवरून हा वाद सुरू झालेला. या वादामुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, डॉक्टरच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ  व्हायरल होत आहे. तसेच त्यांना शिवीगाळ केली आणि धमकावले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी ताबडतोब कारवाई करत शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन सांखे, राहुल घरत, रोहित गावित यांच्यासह सात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निलंबित केले.

हेही वाचा – Beed News : शेतकऱ्यांनी आंदोलनाकडे फिरवली पाठ, अवघ्या 15 मिनिटांत आंदोलन गुंडाळलं; शिवसेना जिल्हाप्रमुखांचा उबाठा नेत्यावर घणाघात
 

गुन्हा दाखल झालेल्या 17 जणांपैकी 10 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. शिंदे म्हणाले, 'जर रुग्णाच्या बिलांबाबत काही अनियमितता असेल, तर स्वतःच्या हाताने कायदा हातात घेण्याऐवजी कायदेशीर मार्गाने तक्रार करायला हवी होती. शिवसेना अशा वर्तनाचे समर्थन करणार नाही. डॉक्टर आणि इतर आरोग्य व्यावसायिकांवरील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही', असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number