Khawaja Asif : नेतान्याहूंचे अपहरण करा! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा अमेरिकेला अजब सल्ला

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबद्दल...
Khawaja Asif : नेतान्याहूंचे अपहरण करा! पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा अमेरिकेला अजब सल्ला

Khawaja Asif on Benjamin Netanyahu: पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर थेट इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केले आहे. नेत्यानाहू हे ‘मानवतेचे सर्वात मोठे शत्रू’ असून अमेरिकेने त्यांचे अपहरण करावे, अशी मागणी त्यांनी एका टीव्ही मुलाखती दरम्यान केली आहे.

‘मादुरो यांच्याप्रमाणेच नेतान्याहूंचा न्याय करा’
एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी व्हेनेझुएलाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अपहरण करून त्यांना अमेरिकन न्यायालयात उभे केले, त्याच धर्तीवर नेतान्याहू यांच्यावरही कारवाई व्हायला हवी. अमेरिका जर खरोखरच स्वतःला मानवतेचा कैवारी समजत असेल, तर त्यांनी जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला (नेतान्याहू) न्यायालयात खेचले पाहिजे,’ असेही ते पुढे म्हणाले. इस्रायलने गाझा पट्टीत जो हिंसाचार केला आहे, त्याबद्दल नेतान्याहू यांना जागतिक स्तरावर गुन्हेगार घोषित करण्याची मागणी आसिफ यांनी लावून धरली.

हेही वाचा – Bangladesh Violence : आधी बेदम मारहाण, मग बळजबरीने विष पाजलं…; बांगलादेशात आणखी एका हिंदूला संपवलं

तुर्कीये काय एनजीओ आहे का? – ख्वाजा आसिफ यांचा प्रतिप्रश्न
मुलाखतकार हमीद मीर यांनी जेव्हा विचारले की, जर तुर्कीयेने नेतान्याहू यांचे अपहरण करून त्यांना अंकारा येथे नेले तर काय होईल? त्यावर आसिफ यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “तुर्कीये काय एखादी स्वयंसेवी संस्था (NGO) आहे का? त्यांनी या कामाचे कंत्राट घेतले आहे का?” मात्र, प्रत्येक पाकिस्तानी नागरिक नेतान्याहू यांच्यावरील कारवाईसाठी प्रार्थना करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

विचित्र विधानानंतर मुलाखत अर्धवट थांबवली
या धक्कादायक विधानांमुळे मुलाखतीचा माहोल अचानक बदलला. ज्येष्ठ पत्रकार हमीद मीर यांनी या विधानानंतर लगेचच कार्यक्रमात ब्रेक घेतला. विशेष म्हणजे, ब्रेकनंतर संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ चर्चेत सहभागी नसतील, असे सांगून मुलाखत तिथेच थांबवण्यात आली. ‘पाकिस्तान अनटोल्ड’ या सोशल मीडिया हँडलवरून या मुलाखतीची क्लिप व्हायरल झाली असून, यावरून आता नवीन राजनैतिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – ‘स्वतःच्या कामावर लक्ष द्या’; उमर खालिदला पत्र पाठवणाऱ्या जोहरान ममदानीला भारताने सुनावले खडे बोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version