Nilesh Rane Sting Operation: ‘कोणाच्या बेडरूमपर्यंत…’ बावनकुळेंचा राणेंना सवाल; निलेश राणेंचं ‘स्टिंग ऑपरेशन’ वादात!

या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले आहे.
Nilesh Rane Sting Operation: ‘कोणाच्या बेडरूमपर्यंत…’ बावनकुळेंचा राणेंना सवाल; निलेश राणेंचं ‘स्टिंग ऑपरेशन’ वादात!

Nilesh Rane Sting Operation : राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या कोकणातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरी थेट ‘स्टिंग ऑपरेशन’ (Sting Operation) केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईदरम्यान संबंधित भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात नोटांनी भरलेली एक बॅग आढळून आल्याचा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. या घटनेमुळे महायुतीमधील (Mahayuti) दोन प्रमुख पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

बावनकुळेंचा राणेंना थेट सवाल
या संपूर्ण घडामोडींवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया देत निलेश राणे यांच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ‘एखाद्याच्या घरात थेट बेडरूमपर्यंत (Bedroom) जाऊन अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन करणे योग्य आहे का? अशा प्रकारे कोणाच्या घरात जाण्याचा किंवा कोणाच्या बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का?” असे सवाल बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ‘ज्यांच्या घरात पैसे सापडले, त्यांनी ते कुठून आणले आणि ते कोणत्या व्यवहारातील आहेत, याचा तपास पोलीस करतील. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले, असे लगेच म्हणणे योग्य नाही.’

हेही वाचा – Raj – Uddhav Thackeray : मनसे-शिवसेना ठाकरे गटाची युती होणार?; राज-उद्धव भेटीने वाढली उत्सुकता

नितेश राणेही या कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले
ज्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केलं, त्याच कार्यकर्त्याच्या घरी नितेश राणेही पोहोचले. त्यांनीही तेथे जाऊन झालेल्या प्रकाराची चौकशी केली. दरम्यान, रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या घरी पैसे पोहोचवले जातायत असा थेट आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे. तसेच, यासंदर्भात मालवण नगरपरिषद मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. निवडणूक आयोग या स्टिंग ऑपरेसनची दखल घेतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याशिवाय, शिवसेनेचे राजन तेली यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.

लाइव्ह व्हिडीओद्वारे राणेंकडून गंभीर आरोप
शिवसेना (शिंदे) आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला. त्यांना घरात पैशांनी भरलेली बॅग आढळून आल्याचा आरोप त्यांनी केला आणि या संदर्भात आपल्या सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडीओ देखील केला. या व्हिडीओमध्ये निलेश राणे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत निवडणुकीत पैशांचा गैरवापर होत असल्याचा दावा केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे कोकणातील राजकारण ढवळून निघाले आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्याचे बावनकुळेंचे मत
मंत्री बावनकुळे यांनी निलेश राणे यांच्या स्टिंग ऑपरेशनच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. “निलेश राणे यांनी काय करावे हे मला माहिती नाही, पण एखाद्याच्या बेडरूमपर्यंत जाऊन व्हिडीओ शूटिंग (Video Shooting) करणे हे नियमाच्या बाहेर आहे असे मला वाटते,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राणे यांनी जी बाब पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) लक्षात आणून दिली आहे, त्याबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे.

हेही वाचा – Eknath Shinde : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचा एल्गार; ‘शिवसेना को हराना मुश्किलही नही नामुन्कीन है!’, म्हणत विरोधकांना दिला इशारा

ठाकरे गटाचे वैभव नाईक काय म्हणाले?
ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘मी याबद्दल माझ्या फेसबुक अकाऊंटवरही लिहिलं आहे. निलेश राणे यापूर्वी निवडणुकांमध्ये जेव्हा प्रचार प्रमुख होते, तेव्हा पैसे वाटले नव्हते का, तेव्हाही वाटले होते. भाजपही पैसे वाटत आहे शिंदे गटही पैसे वाटत आहे. कोणी कमी कोणी जास्त वाटत आहे.  एकेका मतासाटी दहा-दहा हजार वाटत असतील, तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. निवडणूक आयोग यावर काहीही कारवाई करत नाही. भाजप आणि शिंदे गट दोगेही पैसे वाटतायत. ज्या कार्यकर्त्यांनी यांना मदत केली, त्यांच्याच घरी हे स्टिंग ऑपरेशन करतायत.’

निलेश यांचे स्टिंग ऑपरेशन आणि Ravindra Chavan यांच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या घरी पैसे पोहोचल्याचा आरोप

नितेश राणेही त्या कार्यकर्त्याच्या घरी पोहोचले

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version