नेहानचा प्रेग्नंसी फोटोवर खुलासा…

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहाने शुक्रवारी काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. यात नेहा पती रोहनप्रीत सिंहसोबत दिसत होती आणि फोटोत नेहाचा बेबी बंप दिसत होता. या फोटोवर नेहाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. त्यानंतर नेहा या फोटोवर खुलासा केला आहे. फोटोमध्ये नेहा ही प्रेग्नंट दिसत आहे मात्र बेबी बंपसोबत असलेली […]

नेहानचा प्रेग्नंसी फोटोवर खुलासा…

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नेहाने शुक्रवारी काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली. यात नेहा पती रोहनप्रीत सिंहसोबत दिसत होती आणि फोटोत नेहाचा बेबी बंप दिसत होता. या फोटोवर नेहाला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. त्यानंतर नेहा या फोटोवर खुलासा केला आहे. फोटोमध्ये नेहा ही प्रेग्नंट दिसत आहे मात्र बेबी बंपसोबत असलेली ही फोटो तिच्या आगामी नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या नव्या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होत. नेहाच्या आगामी गाण्याचं नाव ‘खयाल रख्या कर’असं आहे. हे गाणं २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीत सिंहदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

शुक्रवारी नेहाने रोहनप्रीतसोबतचा फोटो शेअर केली होती. या फोटोमध्ये तिचं बेबी बंप दिसत होतं त्यासोबतच तिने खयाल रख्या कर असं कॅप्शन दिलं होतं. तर रोहनप्रीतनेदेखील “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट केली होती. त्यामुळे नेहा गरोदर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता नेहाने फोटोचा खुलासा करत चर्चेला पूर्ण विराम लावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number