Beed Flag Hoisting : ध्वजारोहणाला निमंत्रण नाही, मला जाणीवपूर्वक डावललं, शरद पवार गटाचे आमदार सुनेत्रा पवारांवर नाराज

बीडमध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर यांना प्रशासनाकडून कसलेही आमंत्रण आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Beed Flag Hoisting : ध्वजारोहणाला निमंत्रण नाही, मला जाणीवपूर्वक डावललं, शरद पवार गटाचे आमदार सुनेत्रा पवारांवर नाराज

देशभरात भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी सुनेत्रा पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत बीडच्या जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या ध्वजारोहण सोहळ्यास आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कावत व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती. ध्वजारोहण सोहळ्यानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. 

मात्र या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला आमदार संदीप क्षीरसागर यांना प्रशासनाकडून कसलेही आमंत्रण आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर प्रशासनाबरोबरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. जेव्हा जेव्हा बीड जिल्ह्याचा पालकमंत्री बीडमध्ये येतात तेव्हा तेव्हा मला जाणीवपूर्वक डावललं जातं. त्यांचे काम कोण भरतय हे मला माहीत नाही. इथे कोणीही डेरा घातला तरी त्याला काही मतलब नाही असं म्हणत त्यांनी आमदार विजयसिंह पंडितांना टोला लगावला. त्यांच्या पीएच्या आणि काही लोकांच्या ऐकण्यावरून हे सगळं होत असल्याची खंत देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही खंत बोलून व्यक्त केली.

हेही वाचा- Nagpur News : कर्तव्य बजावताना दाखवलेल्या धैर्याला राष्ट्रीय सलाम; राष्ट्रपती पदकांसाठी नागपूरच्या पाच पोलिसांची निवड

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, "गेल्यावेळी कंकालेश्वर च्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण दिले नव्हते. मी इथला लोकप्रतिनिधी असतानाही मला निमंत्रण नव्हते. यामध्ये राजकारण होत आहे. DPDC मध्ये आम्ही बोगस बिलं काढल्याच्या तक्रारी केल्या त्यातंही काहीच केले नाही. अजितदादांनी जे-जे लोकांना शब्द दिले होते ते आता त्यांनी पाळले पाहिजेत, ते जेवढ्या दुःखात आहेत तेवढ्या दुःखात आम्हीही आहोत. विकास कामांबाबतीतही निधी मिळत नाही. मी नाराज आहे, का नाराज होऊ नये? बीड शहराला दहा दिवसाला पाणी मिळत होते ते आता वीस दिवसाला मिळत आहे."

"वेळ पडल्यास आता आम्ही गप्प बसणार नाही रस्त्यावर उतरणार. पीए झरे आणि देशमुख यांच्या म्हणण्यावरुन इथला कारभार होतोय. सुनेत्रा ताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये. दादा आणि पंकजाताईंच्या काळातला कारभार पाहिला, सामाजिक काम आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर ते मार्गी लावायचे. इथे कोणीही डेरा घातला तरी त्याला काही मतलब नाही. मी विरोधी पक्षातला आमदार असताना दादांचे बॅनर लावले. मला आज सुध्दा ध्वजारोहणासाठी कुठलंही निमंत्रण नाही."

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number