Nana Patole On ECI : ‘निवडणूक आयोग भाजपचा चपराशी बनलाय’; खर्गे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

जनतेमध्ये भाजपबद्दल प्रचंड रोष असून केवळ जुमलेबाजीच्या जोरावर हे सरकार टिकून असल्याचेही पटोले यांनी म्हटले.
Nana Patole On ECI : ‘निवडणूक आयोग भाजपचा चपराशी बनलाय’; खर्गे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर देताना नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Nana Patole Criticizes ECI : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. भाजप लोकशाही मार्गाने नव्हे, तर निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणुका जिंकत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “निवडणूक आयोग हा भाजपचा चपराशी बनून काम करत आहे,” असे म्हणत त्यांनी आयोगाच्या स्वायत्ततेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनतेमध्ये भाजपबद्दल प्रचंड रोष असून केवळ जुमलेबाजीच्या जोरावर हे सरकार टिकून असल्याचेही पटोले यांनी म्हटले. संसदेत निवडणूक आयोगाच्या विरोधात आणलेला प्रस्ताव फेटाळण्यामागे सत्ताधाऱ्यांची भीती असल्याचेही त्यांनी सांगितले.

आसामच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा
भाजपच्या जातीयवादी राजकारणावर टीका करताना पटोले यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला. “तुमचे मुख्यमंत्री विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करत आहेत, हा कोणता जातीयता वाद आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भारताचे संविधान सर्व धर्माच्या नागरिकांचा आदर करायला शिकवते, मात्र भाजप सत्तेसाठी दलित आणि मुस्लिमांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आसामचे मुख्यमंत्री संविधानाच्या जोरावरच पदावर बसले आहेत, हे त्यांनी विसरू नये, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा – Baramati Byelection 2026 : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या आकाश मोरेंची माघार; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

महागाई आणि बेरोजगारीवरून सरकारला घेरले
पटोले यांनी भाजपवर केवळ धार्मिक मुद्द्यांवरून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. “तुम्ही खरे हिंदू असता तर सर्वांना सोबत घेऊन चालला असता, पण तुम्ही तर हिंदूंच्या जीवावर उठला आहात,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांवर सरकारकडे कोणतेही उत्तर नाही. भाजपने सत्तेत आल्यापासून केवळ देश विकण्याचे काम केले असून काँग्रेसने उभ्या केलेल्या संस्था मोडीत काढल्याचा आरोपही त्यांनी केला.

खर्गे यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानावरून भाजपने केलेल्या टीकेला उत्तर देताना पटोले म्हणाले की, खर्गे यांच्यावर बोलणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. काँग्रेस हा सामान्य जनतेच्या हृदयातील पक्ष असून ही जमिनीवर काम करणारी संघटना आहे. भाजपचे नवीन पदाधिकारी प्रसिद्धीसाठी काँग्रेस नेत्यांवर आरोप करत आहेत, मात्र त्यांनी प्रथम आपल्या सरकारचा कारभार तपासावा. गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ सांप्रदायिक तेढ निर्माण करणे हाच भाजपचा अजेंडा असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

 

हेही वाचा – NCP Meeting In Delhi: राज्यात काँग्रेसची मनधरणी, तर दिल्लीत राष्ट्रवादीची खलबतं; खासदार सुनील तटकरेंच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version