मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवमकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या दोघांचा पराभव केला. जायंट किलर ठरलेल्या महेश सावंत यांचे निवडणुकीतील दणदणीत विजयामुळे कौतुक होत होते. पण गुरुवारी संध्याकाळपासून महेश सावंत वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
निवडणुकीतील कामाच्या ताणामुळे महेश सावंत यांना त्रास झाला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महेश सावंत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करुन घेतले. महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांच्या सल्ल्याने महेश सावंत लिलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील दोन ते तीन दिवस डॉक्टर महेश सावंत यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवतील. अपेक्षित सुधारणा दिसल्यास महेश सावंत यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल.
माहीम विधानसभा मतदारसंघ – निवडणूक निकाल
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.