मुंबई : मुंबई महानगरपालिकेत नवा धमाका होण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दाक मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केला आहे. त्यामुळे शिंदेपाठोपाठ आता भाजपकडूनही ठाकरे गटाला हादला बसण्याची शक्यता आहे. मुंबई भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत अमित साटम यांनी हा दावा केल्याचे समजते. असे झाल्यास राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे गटात, शिवसेनेत प्रवेश केला. तसेच काही ठिकाणी नगर पंचायतीच्या नगरसेवकांनीही ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. मात्र आता शिंदे गटासोबतच भाजपमध्येही ठाकरेंने शिलेदार सामील होण्याच्या मार्गावर असल्याचे साटम यांच्या दाव्यावरून स्पष्ट होते.
गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंची सत्ता होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने प्रथमच मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवली. मात्र अमित साटम यांच्या दाव्यानुसार विरोधी पक्षातील ठाकरेंचे नगरसेवक जर भाजपमध्ये सामील झाले, तर ठाकरेंना महापालिकेतही चांगलाच दणका दिला जाईल. आता ठाकरेंने नगरसेवक खरच भाजपमध्ये प्रवेश करणार की साटमांचा दावा फोल ठरणार, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.