नवी दिल्ली: पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) पूर्ण पाठिंबा दिला आहे. देशाच्या स्वाभिमानाचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे एक आवश्यक पाऊल असल्याचे आरएसएसने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर, त्यांच्या तळांवर आणि समर्थन नेटवर्कवर भारतीय लष्कराची कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नमूद केलं आहे.
हेही वाचा – वधू-वरांनी ब्लॅकआउट दरम्यान अंधारात घेतले सात फेरे; अनोख्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना मोहन भागवत काय म्हणाले?
एका संयुक्त निवेदनात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक पायाभूत सुविधांविरुद्धची लष्करी कारवाई दहशतवादाविरुद्ध देशाच्या दृढनिश्चयाचे प्रतिबिंब आहे. या कृतीमुळे देशात न्याय मिळेल आणि संपूर्ण देशाचा स्वाभिमान बळकट होईल. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलांसोबत उभा आहे. याशिवाय, निवेदनात भारतीय सीमेवरील धार्मिक स्थळे आणि नागरी भागांवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला असून पीडित कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करण्यात आल्या.
राष्ट्रीय स्वयंसवेक संघ द्वारा जारी किया गया वक़्तव्य –
पहलगाम की कायरतापूर्ण आतंकवादी घटना के पश्चात पाक प्रायोजित आतंकवादियों एवं उनके समर्थक पारितंत्र पर की जा रही निर्णायक कार्रवाई “ऑपरेशन सिंदूर” के लिए भारत सरकार के नेतृत्व और सैन्यबलों का हार्दिक अभिनंदन। हिंदू यात्रियों… pic.twitter.com/kThkYmVdLw — RSS (@RSSorg) May 9, 2025
हेही वाचा – राजनाथ सिंह यांनी घेतली तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत बैठक; सुरक्षा परिस्थिती व संभाव्य धोक्यांबद्दल झाली चर्चा
RSS चे नागरिकांना आवाहन –
पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांवर, त्यांच्या तळांवर आणि समर्थन नेटवर्कवर भारतीय लष्कराची कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचेही संघाने म्हटले आहे. या संकटाच्या वेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व नागरिकांना सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच, आरएसएसने लोकांना सामाजिक एकता राखण्याचे आणि देशविरोधी घटकांचे कोणतेही कट उधळून लावण्याचे आवाहन केले आहे. तथापि, RSS ने सर्व देशवासीयांना त्यांचे नागरी कर्तव्य पार पाडण्याचे आणि आवश्यकतेनुसार सैन्य आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि एकता मजबूत करण्याचे आवाहन केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.